Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

Hello Solapur by Hello Solapur
17-May-2026 09:02 am
in जिल्हा
0
सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी
0
SHARES
413
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात सुरू असलेल्या श्री रामलिंग चौंडेश्वरी यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून यात्रेतील मुख्य आकर्षण असलेल्या ‘बाळबट्टल’ विधीसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मध्यरात्री हा पारंपरिक विधी पार पडला.

हातात तलवार आणि चांदीची वाटी घेत गाव प्रदक्षिणा करणारा बाळबट्टल हे या यात्रेचे मुख्य आकर्षण मानले जाते. वळसंगसह आसपासच्या गावांमधून हजारो भाविक हा सोहळा पाहण्यासाठी यात्रेत सहभागी झाले होते.

श्री रामलिंग चौंडेश्वरी यात्रा ही हटगार कोष्टी समाजाची आराध्यदैवत असलेल्या चौंडेश्वरी देवीची यात्रा असून तिला अडीचशे वर्षांची परंपरा लाभली आहे.

बाळबट्टलच्या पायात तब्बल 40 किलो वजनाचे पारंपरिक 300 घडांचे घुंगरू बांधले जातात. यात्रेसाठी सुमारे 12 किलोमीटरची गाव प्रदक्षिणा काढली जाते आणि हा प्रवास जवळपास सात तास चालतो.

“ये तम्मा, बाळबट्टल बत्तरो…” अशा आरोळ्या देत हातात मशाली घेऊन गावाबाहेर धावणारे युवक हा यात्रेतील अत्यंत रोमांचक क्षण ठरतो. हा सोहळा पाहताना भाविकांच्या अंगावर शहारे येतात.

दर्श अमावस्येच्या दिवशी बाळबट्टलला चांदीची वाटी, तलवार, हार, दंडे आणि मुकुटाने सजवले जाते. त्याचबरोबर लाल, हिरवा, पिवळा, काळा, पांढरा आणि केशरी रंगांनी त्याचा चेहरा रंगवला जातो.

स्थानिक परंपरेनुसार, सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी कर्नाटकातील माशाळ गावातून वीर नावाच्या बालकाने ‘बट्टल’ म्हणजेच चांदीची वाटी वळसंग येथे आणली होती. ही बाब समजताच माशाळ गावातील लोकांनी त्या बालकाचा पाठलाग केला. मात्र तो धावत वळसंग येथे पोहोचला आणि तेव्हापासून ही चांदीची वाटी वळसंगमध्येच असल्याची श्रद्धा आहे.

आजही माशाळ गावातील लोक ही वाटी परत घेण्यासाठी येऊ शकतात, अशी धारणा ग्रामस्थांमध्ये असल्याने संपूर्ण रात्र जागरण करून या वाटीचे संरक्षण केले जाते. पूर्वी तलवारी आणि विविध शस्त्रे हातात घेऊन ग्रामस्थ संरक्षण करत असत. मात्र मागील पाच ते सहा वर्षांपासून प्रशासनाने शस्त्र वापरण्यास बंदी घातल्याने आता शस्त्रांशिवाय ही यात्रा पार पडते.

Tags: Balbattalhello solapurSolapur culturesolapur newsValsang Chaudeshwari devi Yatra
Previous Post

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

Next Post

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

Related Posts

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

August 3, 2026
वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

July 31, 2026
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 26, 2026
Next Post
ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In