HELLO SOLAPUR | भारताची राजधानी दिल्लीमध्ये भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये कारमध्ये हा भीषण स्फोट झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
लाल किल्ल्या जवळील मेट्रो स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झाला आहे. सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी हा स्फोट झाला. मेट्रो स्टेशनच्या फाटक क्रमांक 1 जवळ हा भीषण स्फोट झाला.
या स्फोटाची भीषणता तीव्र असल्याने आसपासच्या अनेक वाहनांच्या काचा फुटल्या आहेत.
या भीषण स्फोटानंतर आसपासच्या कारने देखील पेट घेतल्याने अनेक लोक जखमी झाले. दरम्यान या स्फोटानंतर जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
स्फोट झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. घटनेनंतर परिसरात अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या तसेच बॉम्बशोधक पथक देखील तात्काळ दाखल झाले.
दरम्यान या घटनेमागे नेमके कोणती संघटना आहे याबाबत कोणतेही स्पष्टता आलेली नाही.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्वीट :









