Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात मित्राच्या आत्महत्येचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्या मित्राने संपवले जीवन

Hello Solapur by Hello Solapur
25-Nov-2025 08:57 am
in क्राईम
0
0
SHARES
282
VIEWS

HELLO SOLAPUR | दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे दोन जिवलग मित्रांनी कमी वेळाच्या अंतराने आत्महत्या केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. गोरख भोई आणि सुरेश भोई अशी मृत्यू पावलेल्या दोन्ही जिवलग मित्रांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेने वांगी गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,
वांगी येथील गोरख भोई यांनी प्रथम आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असतानाच अंत्यविधीचे कार्यक्रम सुरू झाले.

दरम्यान, गोरख भोई यांच्या मृत्यूचे दुःख आणि भावनिक आघात सहन न झाल्यामुळे त्याचा जिवलग मित्र सुरेश भोई यानेही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. गोरखचा अंत्यविधी सुरू असतानाच सुरेशने शेतात जाऊन झाडाला गळफास घेत आपलं जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आला.

सुरेश भोई यांचे आई-वडील हे शेतात मजूर म्हणून काम करतात. मुलाने घेतलेले हे टोकाचे पाऊल पाहता कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एकाच गावातील दोन तरुण मित्रांचे अशा प्रकारे झालेले मृत्यू गावासाठी मोठा धक्का ठरला आहे.

या संपूर्ण घटनेची नोंद दक्षिण सोलापूर येथील मंद्रूप पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

महत्वाची सूचना :
मानसिक तणाव, नैराश्य किंवा भावनिक आघाताचा सामना करत असाल, तर कृपया तात्काळ आपल्या कुटुंबीयांशी, जिवलग मित्रांशी किंवा समुपदेशक/तज्ज्ञांशी संपर्क साधा. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा मार्ग नाही. मदत घ्या, बोलून दाखवा – तुमचं जीवन अमूल्य आहे.

Tags: Dakshin SolapurMarathi newssolapursolapur newssolapur policeSolapur Rural Policesouth solapursuside news
Previous Post

सोलापुरात या प्रभागात 7 कोटींच्या विकासकामांचा आमदार देवेंद्र कोठेंच्या हस्ते शुभारंभ

Next Post

अक्कलकोटच्या सांगवी बुद्रुक गावात 6 महिन्यात 200 बोगस मतदारांची नोंद? चौकशीची मागणी

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

March 6, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026
Next Post

अक्कलकोटच्या सांगवी बुद्रुक गावात 6 महिन्यात 200 बोगस मतदारांची नोंद? चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In