Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का; दोन हुकमी एक्के भाजपात गेले

Hello Solapur by Hello Solapur
25-Dec-2025 00:23 am
in राजकारण
0
0
SHARES
686
VIEWS

HELLO SOLAPUR : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश सोहळा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन हुकमी एक्के भाजपमध्ये दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये युती होत असतानाच, दुसरीकडे सोलापुरात भाजपने थेट अजित पवार गटाला मोठा धक्का देत संघटनेतील महत्वाचे नेते फोडण्यात यश मिळवले आहे.


किसन जाधव आणि नागेश गायकवाड हे सोलापूर शहरातील प्रभावशाली आणि संघटनात्मक ताकद असलेले नेते मानले जातात. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठे खिंडार पडले असून, पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


या पक्षप्रवेशावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपची विचारधारा, विकासाचे राजकारण आणि आगामी महापालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्ता आणण्याचा निर्धार यावर भर दिला. “भाजपमध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान आणि संधी दिली जाईल,” असे आश्वासनही त्यांनी दिले.


दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रवेश झाल्याने भाजपची ताकद निश्चितच वाढणार असून, सोलापूरच्या राजकारणात आगामी काळात आणखी उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Tags: BjpBjp SolapurDevendra KotheJaykumar GoreKisan Jadhavminister jaykumar goreMla Sachin KalyanshettyNagesh GaikwadNcp Ajit pawar gatNcp santosh pawarNcp SolapurSolapur bjpsolapur bjp ruralSolapur Ncpsolapur news
Previous Post

3 वर्षीय चिमुकल्याची आईच्या कथित प्रियकराकडून हत्या; हत्येचे कारण ऐकून व्हाल थक्क

Next Post

भाजपच्या दोन्ही आमदारांच्या बैठकीत नक्की काय घडलं?

Related Posts

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
Next Post

भाजपच्या दोन्ही आमदारांच्या बैठकीत नक्की काय घडलं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In