Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

बाळासाहेब सरवदे हत्येप्रकरणी भाजप उमेदवार शालन शिंदेंसह 15 जणांवर गुन्हा दाखल

Hello Solapur by Hello Solapur
03-Jan-2026 08:07 am
in क्राईम
0
0
SHARES
906
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर शहरात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून झालेल्या मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात भाजपचे उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रभाग क्रमांक 2 क मधील उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून भाजपमधील दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला होता. भाजपकडून शालन शंकर शिंदे यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर, त्यांच्याविरोधात भाजपच्या इच्छुक उमेदवार रेखा सरवदे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.


अर्ज मागे घेण्यासाठी शालन शिंदे यांच्या गटाकडून दबाव टाकण्यात आल्याचा आरोप होत होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, मात्र यानंतरही वाद शमला नाही.


याच वादातून मध्यस्थीसाठी गेलेले मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, भाजप उमेदवार शालन शंकर शिंदे यांनी बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यात चटणी टाकली, त्यानंतर इतर आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या केली.


या प्रकरणी मयत बाळासाहेब सरवदे यांचे भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


या हत्येप्रकरणी आरोपींवर बीएनएस कलम 103, 109, 189 (1) 189 (2), 190, 191 (2), 191 (3), 49, 352, 351 (2) तसेच शस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


एकूण 13 गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाला वेग आला आहे. यामध्ये 4 संशयित आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.


दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अटकेबाबत लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्ठे करत आहेत.


पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अटकेबाबत लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योत्सना भांबिष्ठे करत आहेत.


गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे :

अमर शंकर शिंदे
विशाल शंकर शिंदे
आदर्श शंकर शिंदे
सुनील शंकर शिंदे
राहुल राजू सरवदे
ईश्वर सिद्धेश्वर शिंदे
रोहित राजू सरवदे
तानाजी बाबू शिंदे
महेश शिवाजी भोसले
शंकर बाबू शिंदे
अनिल शंकर शिंदे
सौ. शालन शंकर शिंदे
सौ. शारदा तानाजी शिंदे
आलोक तानाजी शिंदे
विशाल संजय दोरकर

Tags: Balasaheb SaravadeBjp Shankar ShindeBjp Solapurhello solapurJail road police stationSolapur bjpSolapur crimeSolapur Mahapalika Election 2026solapur police
Previous Post

सोलापुरात उमेदवारी मागे घेण्याच्या वादातून मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; हत्येचा घटनाक्रम पुढे

Next Post

भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या  हस्ते प्रकाशन; ‘या’ गोष्टींना दिले प्राधान्य

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

March 6, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026
Next Post

भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या  हस्ते प्रकाशन; 'या' गोष्टींना दिले प्राधान्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In