Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

“पराभव अंतिम नाही, आत्मपरीक्षणातून नवी लढाई”, महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदेंचा कार्यकर्त्यांना भावनिक संदेश

Hello Solapur by Hello Solapur
18-Jan-2026 14:51 pm
in शहर
0
0
SHARES
226
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्या, खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना भावनिक आणि प्रेरणादायी संदेश दिला आहे. पराभव मान्य करत असतानाच त्यांनी हा पराभव अंतिम नसून, भविष्यातील संघर्षासाठी आत्मपरीक्षणाची संधी असल्याचं स्पष्ट केलं आहे. (MP Praniti Shinde message to Congress workers after Mahapalika Election defeat)

प्रणिती शिंदे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे की, अनेक महिन्यांची मेहनत, रस्त्या-रस्त्यांवर फिरून केलेला संघर्ष आणि लोकांपर्यंत पोहोचवलेला विचार निवडणूक निकालात आकड्यांमध्ये उतरला नसला, तरी कार्यकर्त्यांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा कधीही हरलेला नाही.

निवडणुकांदरम्यान बलाढ्य धनशक्ती, सत्तेचा दुरुपयोग, प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर तसेच धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रभाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या प्रतिकूल परिस्थितीतही काँग्रेस कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत सोलापूरच्या हितासाठी लढत राहिले, असं त्यांनी नमूद केलं.
“राजकारणात जय-पराजय येत-जात असतात. मात्र कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, निष्ठा आणि प्रामाणिकपणा हीच खरी शिदोरी आहे,” असं सांगत त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला.

या निकालातून आत्मपरीक्षण करत लोकांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि बदलतं सामाजिक वास्तव अधिक खोलवर समजून घेण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यात बलाढ्य धनशक्तीला कशा पद्धतीने तोंड द्यायचं, यावर गंभीर चिंतन करून संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

संदेशाच्या शेवटी त्यांनी, “आज थोडा विराम घेऊ, पण उद्याच्या लढाईसाठी अधिक सज्ज होऊ,” असं सांगत पुढील राजकीय संघर्षासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं आहे.

Tags: Congresshello solapurMahapalika ElectionMahapalika NewsMaharashtra CongressMP Praniti ShindePraniti ShindeSolapur Congresssolapur mahapalikaSolapur Mahapalika Election 2026solapur news
Previous Post

सोलापूर महापालिकेतील घवघवीत यश; मुख्यमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांचा सत्कार

Next Post

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत ‘हे’ दिग्गज नेते, त्यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या मैदानात!

Related Posts

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026
Next Post

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत 'हे' दिग्गज नेते, त्यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या मैदानात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In