Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

Hello Solapur by Hello Solapur
30-Mar-2026 11:11 am
in शहर
0
0
SHARES
17
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी तसेच औद्योगिक वसाहत एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या कामांसाठी ‘क्रिटिकल इन्फ्रा स्कीम’ अंतर्गत तब्बल 65 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या योजनेनुसार एकूण 65 कोटी रुपयांच्या कामांपैकी 14 कोटी रुपये हे संबंधित उद्योजकांकडून उभारले जाणे अपेक्षित होते. मात्र, विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर एमआयडीसीतील उद्योजकांच्या वाट्याचा हा खर्च पूर्णपणे माफ केला आहे. त्यामुळे उद्योजकांना 14 कोटी रुपयांची थेट आर्थिक सूट मिळाली असून, उद्योग क्षेत्रात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, राज्यात अशा प्रकारचा निर्णय प्रथमच घेण्यात आला असून, तो केवळ सोलापूर एमआयडीसीसाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय सोलापूरसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक मानला जात आहे.

या निधीच्या माध्यमातून अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील तब्बल 35 रस्ते, तसेच औद्योगिक वसाहतीतील 9 रस्त्यांचे काम एकाचवेळी हाती घेतले जाणार आहे. या कामांमुळे औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत होणार असून, वाहतूक आणि उत्पादन प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे.

राज्यात महापालिका हद्दीत एमआयडीसी असलेली केवळ सोलापूर आणि सांगली ही दोनच शहरं आहेत. त्यामुळे सोलापूरसाठी घेतलेला हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

या संदर्भात आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, या निर्णयामुळे सोलापूर एमआयडीसीतील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.

दरम्यान, अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री आणि आमदार देवेंद्र कोठे यांचे आभार मानले आहेत. आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नांमुळे आमचा एक महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागला असून, ते आमदार झाल्याने आमच्या उद्योजकांचे भाग्य उजळले, अशी प्रतिक्रिया उद्योजक पेंटप्पा गड्डम यांनी दिली.

एकंदरीत, 65 कोटी रुपयांचा निधी आणि 14 कोटी रुपयांची सूट यामुळे सोलापूरच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, भविष्यातील गुंतवणुकीसाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Tags: cm devendra fadanvisDevendra FadanvisDevendra Kothemla devendra kothesolapursolapur mahapalikasolapur news
Previous Post

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

Next Post

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली; ‘हे’ आहेत सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

Related Posts

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026
Next Post

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली; 'हे' आहेत सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In