Wednesday, April 22, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

Hello Solapur by Hello Solapur
20-Apr-2026 21:45 pm
in शहर
0
0
SHARES
178
VIEWS

HELLO SOLAPUR | नियमित कर भरणाऱ्यांना कोणतीही करवाढ, दरवाढ न करता सोमवारी झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत १३७८ कोटी रुपयांच्या सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली.

मनपा सभेची मंजुरी म्हणजे दररोज समतोल पाणीपुरवठ्याच्या दिशेने पडलेले सकारात्मक पाऊल आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठीची ही योजना मंजूर करण्यात आली. या योजनेसाठी जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य मिळणार आहे.

शहरी भाग आणि हद्दवाढ भाग अशा संपूर्ण शहराला दररोज २४ तास समतोल पाणीपुरवठा करण्यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली. पूर्वीच्या ८९२ कोटी रुपयांच्या मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेमध्ये जागतिक बँकेने आणि महाराष्ट्र शासनाने काही सुधारणा करण्यास सांगितल्या होत्या.

त्यानुसार त्या सुधारणा करून नव्याने १३७८ कोटी रुपयांची सुधारित पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे, असेही महापौर श्री. कोंड्याल म्हणाले.

सुधारित पाणीपुरवठा योजनेमध्ये १५० कोटी रुपयांच्या शासनाला भरावयाच्या जीएसटी कराचा समावेश आहे. सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पूर्वीच्या योजनेतील १२० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राऐवजी १५० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे.

पूर्वीच्या योजनेनुसार शुद्ध जलवाहिनी (फिडर मेन) ६५.७८ किमीची होणार होती. सुधारित योजनेअंतर्गत ती ७७.८ किमीची असेल. पूर्वीच्या योजनेत ११ एमएलचे ६ एमबीआर (मास्टर बॅलन्सिंग रिझर्वायर) प्रस्तावित होते. सुधारित योजनेनुसार २९ एमएलचे १० एमबीआर राहणार आहेत. ३१.८ एमएलचे २४ उंच जलकुंभ (इएसआर) बांधण्याचे नियोजन पूर्वीच्या योजनेत करण्यात आले होते.

मात्र शहराच्या पाणीपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेऊन सुधारित योजनेनुसार आता ५३.३ एमएलचे ३० उंच जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. शहरात समतोल पाणी वितरण व्यवस्थेसाठी ७२० किमी जलवाहिनी अंथरण्यात येणार होती.

सुधारित योजनेनुसार शहरात एकूण १११७ किमी जलवाहिनी अंथरण्यात येणार आहे. पूर्वीच्या योजनेनुसार ४० हजार एएमआर मीटर बसविण्यात येणार होते. सुधारित पाणीपुरवठा योजनेअंतर्गत यात २ लाख १८ हजार ८५३ मेकॅनिकल मीटरची वाढ करून एकूण २ लाख ४८ हजार मिळकतींना पाण्याचे मीटर बसवण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे सोलापूर शहरात पाण्याची मोठी बचत होणार असून नागरिकांकडून पाण्याचा जितका वापर होईल तितकेच बिल नागरिकांना येणार आहे, असेही महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरकरांना मिळणार मुबलक पाणी : विनायक कोंड्याल, महापौर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे सोलापूरला दररोज समतोल पाणीपुरवठा करण्यासाठीची ही ऐतिहासिक आणि महत्वकांक्षी योजना सोलापूरला मंजूर झाली आहे. पुढील ४० वर्षांचा सोलापूर शहर विस्ताराचा विचार करून ही योजना बनवण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या योजनेस मिळालेली मंजुरी म्हणजे दररोज समतोल पाणीपुरवठ्याच्या दिशेने पडलेले सकारात्मक पाऊल आहे. यासाठी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

Tags: Amol bapu shindeChetan Narotehello solapurMarathi newssolapur mahapalikaSolapur Mayor Vinayak Kondyalsolapur newssolapur politics
Previous Post

सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न : जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

Next Post

ट्रक ड्रायव्हरच्या मुलाला महागडी शस्त्रक्रिया सांगितल्याने कुटुंब आर्थिक संकटात; मात्र मुख्यमंत्र्यांनी केली मोठी मदत

Related Posts

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026
Next Post

ट्रक ड्रायव्हरच्या मुलाला महागडी शस्त्रक्रिया सांगितल्याने कुटुंब आर्थिक संकटात; मात्र मुख्यमंत्र्यांनी केली मोठी मदत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ट्रक ड्रायव्हरच्या मुलाला महागडी शस्त्रक्रिया सांगितल्याने कुटुंब आर्थिक संकटात; मात्र मुख्यमंत्र्यांनी केली मोठी मदत

April 22, 2026

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न : जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

April 18, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In