Wednesday, June 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

Hello Solapur by Hello Solapur
28-May-2026 14:33 pm
in महाराष्ट्र
0
0
SHARES
20
VIEWS

HELLO SOLAPUR | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 30 मेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे. “मेलो तर मेलो, पण आता मागे हटणार नाही,” असा इशारा देत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजाला वारंवार आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी केली नाही. “आम्ही चर्चेला कधीच नकार दिला नाही. मात्र आता फोनवरून चर्चा होणार नाही. सरकारलाच उत्तर द्यायला जागा उरलेली नाही,” असे ते म्हणाले.

30 मेपासून सुरू होणारे उपोषण अत्यंत टोकाचे असेल, असे स्पष्ट करत त्यांनी कोणत्याही मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत गर्दी करू नये, असे आवाहन केले. “मंडपात नाही, तर भर रणरणत्या उन्हात उपोषण करणार. उष्माघाताने माझा बळी गेला तरी मी मागे हटणार नाही,” असा भावनिक निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देणे, आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या कुटुंबियांना शासकीय नोकरी देणे, तसेच आंदोलनातील तरुणांवरील गुन्हे मागे घेणे या मागण्यांचा समावेश आहे.

“कुणबी आणि मराठा हे दोन्ही एकच आहेत. सरकारला फक्त मराठ्यांची मते पाहिजेत, पण आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय घ्यायची वेळ आली की टाळाटाळ केली जाते,” असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री  यांच्याबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांचे विरोधक नाही. त्यांनी शंभर टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. अजूनही त्यांच्याकडे मराठा समाजाची मनं जिंकण्याची संधी आहे.”

“मराठा समाज हा लढणारा समाज आहे. केवळ आश्वासनांवर आता समाज थांबणार नाही. चर्चा खूप झाल्या, आता निर्णय हवा,” असे सांगत त्यांनी सरकारवर दबाव वाढवला.

यावेळी त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थितीवरही भाष्य केले. “मराठा समाजाला ना पाणी मिळत आहे, ना आरक्षण. गोरगरीब मराठा तरुणांच्या भविष्याशी खेळ सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: Antarwali Saraticm devendra fadanvishello solapurmanoj jarange patilmaratha reservationsolapur news
Previous Post

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

Next Post

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

Related Posts

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026
ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

May 18, 2026
Next Post
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

ताज्या बातम्या

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In