Monday, May 25, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

Hello Solapur by Hello Solapur
21-May-2026 08:07 am
in महाराष्ट्र
0
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!
0
SHARES
488
VIEWS

HELLO SOLAPUR : बालाजी अमाईन्सने चिंचोळी एमआयडीसी, सोलापूर येथील आपल्या युनिट-४ प्रकल्पामध्ये डायमिथाईल इथर (DME) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून दिनांक २० मे २०२६ पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ करण्यात आला आहे. या यशामुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे.

डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ व कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. अनेक पाश्चिमात्य व युरोपीय देशांमध्ये एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमईचे मिश्रण करून त्याचा वापर केला जातो. कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी १,००,००० मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून डीएमईसाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने बीआयएसने (BIS) नुकताच नवीन आयएस कोड प्रसिद्ध केला असून त्यानुसार एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रण करू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) आता डीएमई मिश्रण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले.

जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनांचा विकास ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. डीएमईच्या वापरामुळे भारताची एलपीजी आयातीवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारतामधील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्यामुळे उत्पादन साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक तसेच रोड टँकरद्वारे परिवहन यांसंदर्भातील पुरेशा भारतीय मानकांच्या अभावामुळे PESO परवानग्या व इतर वैधानिक मंजुरी मिळविताना कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय मानकांचा संदर्भ घेऊन त्यांचे परीक्षण व पडताळणी करत आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रारंभी बालाजी अमाईन्स एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे.

या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री. गोविंद मेंचेकरे तसेच महाव्यवस्थापक श्री. विनय दुर्गम उपस्थित होते.

यावेळी डी. राम रेड्डी यांनी कंपनीच्या भविष्यातील धोरणाबाबत माहिती देताना सांगितले की, बालाजी अमाईन्स भारतातील ईव्ही बॅटरी केमिकल्स क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावण्यासाठी वेगाने विस्तार करत आहे. ईव्ही बॅटरी क्षेत्रातील वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी कंपनीने लक्ष केंद्रित केले असून भविष्यात विद्यमान काही प्रकल्पांचे पुनर्रचना करून नव्या पिढीतील ईव्ही बॅटरी केमिकल्स उत्पादनासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे.

डायमिथाईल कार्बोनेट (DMC) – इलेक्ट्रॉनिक ग्रेड :

डीएमसीचा वापर ईव्ही बॅटरी इलेक्ट्रोलाइट्समध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतात या रसायनाचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही एकमेव कंपनी असून कंपनीकडे सध्या वार्षिक १५,००० मे. टन उत्पादन क्षमता उपलब्ध आहे. अत्यल्प अतिरिक्त खर्चात ही क्षमता वाढविण्याची क्षमता कंपनीकडे आहे.

एन-मिथाईल पायरोलिडोन (NMP) – इलेक्ट्रॉनिक ग्रेड :

एनएमपीचे उत्पादन बालाजी अमाईन्स गेल्या दोन दशकांपासून करत असून आता कंपनीने ईव्ही बॅटरी ग्रेड सॉल्व्हेंट विकसित केले आहेत. देशभर उभारल्या जाणाऱ्या गिगा वॅट क्षमतेच्या ईव्ही बॅटरी प्रकल्पांना पुरवठा करण्यासाठी कंपनी सज्ज झाली आहे.

डीएमसी व एनएमपी या दोन्ही रसायनांचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे. या सर्व घडामोडींमुळे विशेष रसायन क्षेत्रातील विविध विभागांमध्ये कंपनी अग्रस्थानी असल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले.

Tags: Bn Balaji Amines solapurDimithile EtherDMEGas Cylender shortagehello solapurHello Solapur NewsLpgMarathi newsRam Reddy
Previous Post

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

Next Post

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

Related Posts

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026
ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

May 18, 2026

ट्रक ड्रायव्हरच्या मुलाला महागडी शस्त्रक्रिया सांगितल्याने कुटुंब आर्थिक संकटात; मात्र मुख्यमंत्र्यांनी केली मोठी मदत

April 22, 2026

सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न : जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

April 18, 2026

उद्योजक अनंत अंबानींच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरात माणुसकीचा महाउत्सव; शिखर पहारिया फाउंडेशनचा पुढाकार

April 8, 2026
Next Post
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

ताज्या बातम्या

May 22, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In