Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

Hello Solapur by Hello Solapur
20-May-2026 21:46 pm
in महाराष्ट्र
0
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट
0
SHARES
115
VIEWS

HELLO SOLAPUR | काही माध्यमांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणार असल्याचा आणि २२ आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात  असल्याच्या  धादांत खोट्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या काही माध्यमांनी ठळकपणे दिल्या आहेत. पण, प्रत्यक्षात एकाही आमदाराने शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या संपर्कात नसून कोणत्याही आमदाराने राजकीय हेतूने भेट घेतलेली नाही, अशी माहिती पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मागील  आठवड्यात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांनी शरद पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीनंतर स्वतः मा. सुनिल तटकरे साहेबांनी माध्यमांना माहिती दिली होती असेही उमेश पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

आज काही वृत्तवाहिन्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे २२ आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्यांमध्ये जाणार असल्याच्या बातम्या प्रसारित करण्यात आल्या. या संदर्भात पक्षाचे नेते उमेश पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली.

ते पुढे म्हणाले की, “सत्तेत असलेले आमदार विरोधी पक्षात जाणार, अशा प्रकारच्या बातम्या कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय चालवणे अत्यंत गैर आहे. २२ आमदार भेटले असल्याचा कोणताही पुरावा माध्यमांकडे आहे का? वारंवार अशा अफवा पसरवून आमच्या पक्षातील आमदारांमध्ये गैरसमज होवू नये यासाठी अधिकृतपणे माहिती देण्यासाठी ही अधिकृत पत्रकार परिषद असल्याचे उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचे आणि कुणालाही भेटण्याचे स्वातंत्र्य आहे. आमच्या पक्षातील आमदार कुणाला भेटायचे किंवा कुठे जायचे यावर कोणतीही बंधने नाहीत. मात्र काही माध्यमांकडून जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे काम सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी पक्षात सुरू असलेल्या प्रवेशाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “आज प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अशा अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि विविध पक्षातील नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत.

शेवटी त्यांनी माध्यमांना आवाहन करताना सांगितले की, “अफवा आणि अप्रमाणित बातम्या दाखवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये. जबाबदारीने आणि सत्य पडताळूनच बातम्या प्रसारित कराव्यात.”

Tags: #Ncp Sunetra Pawarhello solapurMaharashtra PoliticsMarathi newsNcp Ajit pawar gatNcp Sharad pawar gatpolitics
Previous Post

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

Next Post

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

Related Posts

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

August 19, 2026
आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

July 26, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026
Next Post
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In