Thursday, April 16, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

Hello Solapur by Hello Solapur
12-Mar-2026 12:09 pm
in क्राईम
0
0
SHARES
836
VIEWS

HELLO SOLAPUR | घरगुती गॅसचा अवैध वापर आणि विक्री केल्या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातील सांगोला नाका परिसरात घरगुती वापरासाठी असलेला एलपीजी गॅस अवैध पद्धतीने रिक्षामध्ये भरून विक्री केला जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे भरारी पथकाने घटनास्थळी धाड टाकली.

या कारवाईदरम्यान घरगुती वापराचे ८ गॅस सिलेंडर तसेच व्यावसायिक वापराचे ५ सिलेंडर असे एकूण १३ गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या. घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करून त्याची अवैध विक्री केल्याप्रकरणी गणेश बोरीकर यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. गणेश बोरीकर यांना घरगुती गॅसचा पुरवठा करणारी गॅस एजन्सी कोणती, याचा शोध जिल्हा पुरवठा विभागाचे भरारी पथक घेत आहे. अवैध पद्धतीने गॅस पुरवठा केल्याचे आढळल्यास संबंधित गॅस एजन्सीवर देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे.

या संपूर्ण प्रकरणात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध गॅस विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायावर प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

Tags: Crime Newsgas cylendergas supply shortagehello solapurSolapur crimesolapur news
Previous Post

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

Next Post

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

March 6, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026
Next Post

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In