Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग : सोलापुरात शेतकऱ्याने बँकेत भरलेला 4 लाखाचा चेक बँकेतून चोरीला

Hello Solapur by Hello Solapur
10-Oct-2025 20:26 pm
in क्राईम
0
0
SHARES
209
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूरात बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्याला सोयाबीनच्या बीलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर तो चोरीला गेला असून, चोरी झालेला तब्बल चार लाख रुपयांचा चेक अज्ञात व्यक्तीने वटवल्याचं उघड झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील शेतकरी उत्तम दत्तात्रय जाधव यांनी आपला चेक बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेत भरला होता. मात्र काही दिवसांनी संबंधित रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. चौकशीअंती समजले की, हा चेक अनोळखी व्यक्तीने चोरून वटवला आहे.

सुरुवातीला बँकेकडून “शेतकऱ्याने चेक भरलाच नाही” असा दावा केला गेला. परंतु सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बँकेने आपली चूक मान्य केली. तरीदेखील गेल्या आठ दिवसांपासून बँकेचे अधिकारी शेतकऱ्याला वारंवार चकरा मारायला लावत आहेत.

घटनेचा तपशील :
– शेतकऱ्याच्या नावाचा ₹४ लाखांचा चेक बँकेत भरल्यानंतर चोरीला.
– चेक बँकेच्या चेक ड्रॉप बॉक्समधून अमर तेपेदार या व्यक्तीने चोरल्याची प्राथमिक माहिती.
– या प्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रकडून पोलिसांकडे तक्रार दाखल.
– शेतकरी उत्तम जाधव यांनीही यासंदर्भात पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
– बँक प्रशासनाने माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राष्ट्रीयकृत बँकेतील अशी मोठी दुर्लक्षाची घटना समोर आल्याने बँकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

दरम्यान सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र कडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेतून एका अज्ञात व्यक्तीने बँकेच्या चेक बॉक्समधून चेक चोरला आहे.

चोरलेला चेक हा अमर तेपेदार नामक व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याची तक्रार बँकेच्या मॅनेजरकडून पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान बँक प्रशासनाने माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र आमची कार्यालयीन प्रक्रिया सुरु असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

Tags: Bank of MaharashtraBarshinewsBreaking newshello solapurMarathi newsSolapur crimesolapur news
Previous Post

ब्रेकिंग : पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मदत जाहीर

Next Post

आज सोलापुरातील 11 पंचायत समित्यांमधील सभापती पदाची आरक्षण सोडत

Related Posts

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

February 16, 2026

सोलापुरात 62 लाखांची ऑनलाईन फसवणूक करणारा टोळी प्रमुखाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

February 14, 2026

ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्ती धर्मांतर व लग्न; वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा, तिघांना अटक

February 5, 2026

पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावर भीषण अपघात; 4 भाविकांचा मृत्यू, ६ गंभीर जखमी

January 26, 2026
Next Post

आज सोलापुरातील 11 पंचायत समित्यांमधील सभापती पदाची आरक्षण सोडत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share