HELLO SOLAPUR | मागील अनेक वर्षापासून पंचायत समितीच्या निवडणुका राखडलेल्या होत्या. अखेर त्याला आता मुहूर्त लागला आहे.
दोन दिवसांपूर्वी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत पार पडली आहे.
आज पंचायत समितीच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना दिनांक 9 सप्टेंबर 2025 अन्वये सोलापूर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठीची प्रवर्गनिहाय संख्या निश्चित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा (अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती) आणि पंचायत समित्या (सभापती निवडणूक) नियम 1962 मधील नियम 2 फ यातील तरतुदीनुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला यांचेकरीता पंचायत समित्या गठीत होणार आहेत.
त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीकरीता पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण कार्यक्रम पार पडणार आहे.
आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन, सात रस्ता, सोलापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित राहणेबाबत जाहीर आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकान्वये केले आहे.








