Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग | मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहिते पाटलांच्या चौकशीचे आदेश; आठवड्यात मोहिते पाटलांना दुसरा धक्का

Hello Solapur by Hello Solapur
07-Nov-2025 12:33 pm
in राजकारण
0
0
SHARES
288
VIEWS

HELLO SOLAPUR | मोहिते पाटील कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरा धक्का दिला आहे. मोहिते पाटील कुटुंबाशी संबंधित असलेल्या सुमित्रा पतसंस्थेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

माळशिरस तालुक्यातील नातेपुते मंडलाचे उपाध्यक्ष भाजप पदाधिकारी हरी पालवे यांच्या तक्रारीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत. बाळदादा उर्फ जयसिंह मोहिते पाटील हे सुमित्रा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष होते. त्यामुळे सुमित्रा पतसंस्थेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून सहकार विभागाला देण्यात आले आहेत. 

सुमित्रा पतसंस्थेत बोगस कर्ज प्रकरणे दाखवून सामान्य शेतकऱ्यांकडून वसुली केल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच बेकायदा वसुली करून शेकडो कोटी रुपये अध्यक्ष आणि संचालकांनी हडपल्याचाही आरोप करण्यात आला आहे. 

तक्रारीनुसार, मागील दहा वर्षांपासून अधिकाऱ्यांशी संगणमत करून एक हजारांपेक्षा जास्त प्रकरणांमध्ये बोगस वसुली प्रकरणे दाखल करण्यात आली असून, सुमारे पन्नास ते साठ कोटींचा बेकायदा व्यवहार झाल्याचा आरोप भाजप पदाधिकारी हरी पालवे यांनी केला आहे. 



या पार्श्वभूमीवर वरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून तत्कालीन अध्यक्ष बाळदादा उर्फ जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ चौकशीचे आदेश सहकार विभागाला दिले असून, माळशिरस तालुक्यातील सुमित्रा पतसंस्थेची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता वाढली आहे. या चौकशीमुळे मोहिते पाटील कुटुंबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दोनच दिवसांपूर्वी भाजपने राम सातपुते यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे. हा देखील मोहिते पाटलांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर आता थेट मोहिते पाटलांची संबंधित असलेल्या सुमित्रा पतसंस्थेचे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Tags: AklujAkluj NewsDhairyasheel Mohite PatilHari PalaveJaysinh mohitepatilMalshiras NewsMarathi newsMohit patilpoliticsRam SatputeRanjitsinh Mohite Patilsolapursolapur newssolapur political newssolapur politics
Previous Post

सोलापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का! शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांचा अजित पवार गटात प्रवेश

Next Post

सोलापुरात 1500 विद्यार्थ्यांचे सामूहिक वंदे मातरम् गीत अन्  भारताचा मानवी नकाशा; आई प्रतिष्ठानचा उपक्रम

Related Posts

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026
Next Post

सोलापुरात 1500 विद्यार्थ्यांचे सामूहिक वंदे मातरम् गीत अन्  भारताचा मानवी नकाशा; आई प्रतिष्ठानचा उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In