Sunday, March 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

गणेश वानकरांच्या पदयात्रेत लाडक्या बहिणींची रेकॉर्डब्रेक गर्दी; देशमुख मालकांच्या उपस्थितीने उत्साह वाढला

Hello Solapur by Hello Solapur
11-Jan-2026 19:55 pm
in शहर
0
0
SHARES
18
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीनिमित्त प्रभाग क्र. ६ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये लाडक्या बहिणींची मोठी लाट उसळल्याचे पाहायला मिळाली. भाजपचे पॅनल प्रमुख आणि उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड या उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली.

या पदयात्रेच्या प्रारंभी मरीआई चौकातील गवळी वस्ती कामगार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्तिदेवीची पूजा करून वाजतगाजत मोठ्या जल्लोषात पदयात्रेला प्रारंभ झाला. भाजपचे सर्व उमेदवार ओपन जीपमध्ये विराजमान झाले होते. “जय श्रीराम”, “जय भवानी जय शिवाजी”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो”, “पंतप्रधान नरेंद्र मोदी”, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. “काय बोलणार विकास बोलणार ” या गगनभेदी घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

   या रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गवळी वस्ती, बांध वस्ती, दमाणी नगर, गडदर्शन सोसायटी, सोनी सिटी, सन सिटी, आवसे वस्ती आमराई, क्रांती नगर, वाय चौक, देशमुख पाटील वस्ती, जानकर नगर, शेटे वस्ती, गंगा नगर, लक्ष्मी विष्णू मिल चाळ , थोबडे वस्ती, हब्बू वस्ती,थोबडे मळा, देगाव,कोयना नगर,सर्व तांडे या ठिकाणाहून हजारो मतदार तसेच मित्रपरिवार , लाडक्या बहिणी युवा मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणात होती . गळ्यात भाजपचे व सर्वधर्मीय उपरणे , छातीवर कमळाचा बिल्ला घातलेले भाजपचे सर्व उमेदवार पदयात्रेदरम्यान सर्वांना हात जोडून नमस्कार घालत असलेले चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळाले.

तर कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींच्या हातात पक्षाचे झेंडे,डोक्यावर भाजपाची टोपी,हातात बॅनर होते. प्रभागातील सर्व नगरे,वस्त्या,सोसायटी आदी भागांमधून वाजत गाजत पदयात्रा काढण्यात आली .

पदयात्रेमध्ये ठीकठिकाणी सर्व उमेदवारांचे औक्षण करण्यात येऊन त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा देण्यात येत होत्या . अनेकांकडून पुष्पहार घालून तसंच पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून उमेदवारांचे स्वागत करण्यात येत होते.
  
आपण केलेल्या विकास कामाची पावती आपणास सुज्ञ मतदार राजा भरघोस मतदानाच्या रूपाने देईल ,तसेच लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील ,असा विश्वास भाजपचे पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी यावेळी व्यक्त केला.पदयात्रेला युवकांचा तसेच लाडक्या बहिणींचा उदंड प्रतीसाद मिळाला.

  या रॅलीमध्ये पाणीवेस तालीम संघाचे संस्थापक चंद्रकांत वानकर, ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर, महादेव गवळी, बाळासाहेब घुले, माजी नगरसेविका सुनिता कारंडे,मंगलताई वानकर ,औदुंबर जगताप,विजय घुले,किरण वाघमोडे, बालाजी चराटे,दत्तात्रय वानकर ,अर्जुन गायकवाड,विजय वानकर,लखन कारंडे,भीमा गायकवाड,विजय जाधव,राजेश गवळी,सुरेश कोळी,शरद निकम,नाम पवार,संतोष कोरे,विठ्ठल वानकर ,संजय डोके,संभाजी पांढरे,विष्णू जगताप,संदीप काशीद,संतोष जाधव,सुरज काशीद,शेखर कवठेकर, बंटी गवळी,विक्रम पाटील,गुरु खटके,सुनील कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सहभागाने कार्यकर्त्यांमध्ये कमालीची ऊर्जा  !

प्रभाग क्रमांक ६ मधील भाजपचे उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी व सोनाली गायकवाड यांच्या प्रचाराचा शुभारंभ करताना सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आवर्जून हजेरी लावली होती.

तर रविवारी निघालेल्या पदयात्रेमध्ये आवसे वस्ती आमराई येथून आमदार विजयकुमार देशमुख यांनी भाजप उमेदवारांसमवेत सहभाग नोंदविल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची ऊर्जा आणि नवचैतन्य निर्माण झाले  आहे.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघात प्रभाग ६ चे सर्व उमेदवार निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे आमदार देशमुख यांच्या सहभागाने कमालीचा उत्साह आला आहे.

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून या भागात रस्ते, वीज, ड्रेनेज, पाणीपुरवठा आदींची कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली असल्यामुळे भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: Bjp Gamesh WankarBjp Mla Vijaykumar Deshmukhhello solapurMahapalika ElectionMahapalika NewspoliticssolapurSolapur Mahapalika Election 2026solapur newssolapur politicsSolapur Prabhag 6
Previous Post

दररोज पाणी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोलापूरकरांना अभिवचन; हजारोंच्या गर्दीत झाली उत्साही विजय संकल्प सभा

Next Post

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर; असा आहे पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम

Related Posts

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

February 18, 2026
Next Post

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर; असा आहे पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share