Saturday, April 18, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

Hello Solapur by Hello Solapur
05-Feb-2026 11:02 am
in जिल्हा
0
0
SHARES
4.2k
VIEWS

HELLO SOLAPUR | अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून राजकीय बदनामी केल्याप्रकरणी अक्कलकोट पोलिसांनी माजी आमदाराच्या नातवासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अक्कलकोट तालुक्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याविरोधात इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. या पोस्टमुळे त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा आणि करिअरवर वाईट परिणाम घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

‘बेधडक अक्कलकोट’ या अकाउंटवरून बदनामी :
तपासादरम्यान ‘बेधडक अक्कलकोट’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून सातत्याने बदनामीकारक मजकूर प्रसारित केला जात असल्याचे समोर आले. आरोपींनी मित्राची दिशाभूल करून त्याच्या नावावर नवीन सिमकार्ड घेतले आणि त्याद्वारे हे अकाउंट चालवून पोस्ट टाकल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

माजी आमदाराच्या नातू अमर पाटीलवर गुन्हा :
या प्रकरणी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा नातू अमर रमेश पाटील याच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासह आणखी दोन जणांवरही विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.

दोन आरोपी कोठडीत, मुख्य आरोपी फरार :
पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी अमर पाटील फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय कटाचा संशय :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यामुळे आमदार कल्याणशेट्टी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाचा गैरवापर आणि राजकीय स्तरावर होणाऱ्या डिजिटल बदनामीचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

पोलीस तपास सुरू :
अक्कलकोट पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आणखी काही धागेदोरे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे येथे गु.र. नं. 57/2026, भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 318(2),316(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र प्रकारणाची व्याप्ती लक्षात घेऊन यावरून सदर गुन्ह्यास माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 43, 66(डी) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक भिताडे हे करत आहेत.

Tags: Akkalkot NewsAkkalkot PoliticsAmar Ramesh PatilBreaking newshello solapurMarathi newsMla Sachin KalyanshettySiddramappa Patil Akkalkotsolapur news
Previous Post

BREAKING | उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया!

Next Post

ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्ती धर्मांतर व लग्न; वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा, तिघांना अटक

Related Posts

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

2 वर्षांपूर्वी नवरा गेला, आता जगण्याचा आधार असलेली 2 मुलेही शेततळ्यात बुडाली; कुटुंबावर शोककळा

April 13, 2026

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली; ‘हे’ आहेत सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

April 7, 2026

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

January 23, 2026
Next Post

ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जबरदस्ती धर्मांतर व लग्न; वकिलासह पाच जणांविरोधात गुन्हा, तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In