Monday, August 24, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

Hello Solapur by Hello Solapur
03-Aug-2026 08:12 am
in जिल्हा
0
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी
0
SHARES
5
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | सोलापूर येथे आयोजित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (डीसीसी) सेवक पतसंस्थेच्या कार्यक्रमात भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी राजकीय भाषण करताना बार्शीचे ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. याचवेळी त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांची जाहीरपणे माफीही मागितली. (Mla rajendra raut on mla dilip sopal at dcc bank worker Programe )

कार्यक्रमात बोलताना आमदार राऊत म्हणाले, “मागच्या काळात डीसीसी बँकेत माझ्याकडून जो त्रास झाला, त्याबद्दल राजन मालक मी तुमची माफी मागतो.” त्यांच्या या वक्तव्याची कार्यक्रमात उपस्थितांकडून विशेष दखल घेण्यात आली.

डीसीसी बँकेच्या कारभाराबाबत बोलताना त्यांनी, “सोलापूर डीसीसी बँकेचा कारभार आधी व्यवस्थित होता. मात्र काही विचित्र प्राण्यांची एन्ट्री झाली आणि कारभार बिघडला,” अशी टीका केली. हे वक्तव्य करताना त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र त्यांच्या या टीकेचा रोख बार्शीचे ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांच्या दिशेने असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राऊत यांनी पुढे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे अपेक्षा व्यक्त करत, “आता सोलापूर डीसीसी बँकेत जया भाऊ, तुमच्या मनाप्रमाणे घडेल. डीसीसी बँकेकडे विशेष लक्ष द्या. ही बँक शेतकऱ्यांची लक्ष्मी आहे,” असे आवाहन केले.

बँकेच्या आर्थिक स्थितीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, सध्या डीसीसी बँकेत साडेसहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असून बँकेचा कारभार आता व्यवस्थित सुरू आहे. तसेच, “कणखर नेता म्हणून जयाभाऊ आपल्याला लाभले आहेत,” असे म्हणत त्यांनी जयकुमार गोरे यांचे कौतुक केले.

राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “पूर्वी जिल्हा काँग्रेस-राष्ट्रवादीमय होता. लढता लढता नाकेनऊ यायचे. मात्र आता संपूर्ण जिल्हा भाजपमय झाला आहे.”

दूध संघाबाबतही त्यांनी भाष्य करत, “डीसीसी बँकेप्रमाणे दूध संघही व्यवस्थित होऊ शकतो. दूध संघ सुरू झाल्यानंतर हजारो कुटुंबांचे आशीर्वाद मिळतील,” असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी त्यांनी बँकेतील शिस्तीबाबतही एक वेगळे आवाहन केले. “सर्वांनी बँकेत येताना बँकेचा चहाही पिणार नाही, घरचा डबा घेऊनच बँकेत येऊ, असा निर्धार करूया,” असे ते म्हणाले.

जिल्हा मध्यवर्ती बँक सेवक पतसंस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमात आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात विविध पदाधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Dcc bank solapurEx MLA Dilip ManeEx MLA Rajan Patilhello solapurHello Solapur NewsJaykumar Goreminister jaykumar goreMla dilip sopalMla Rajendra Rautrajan patilRajendra Raut
Previous Post

डी-मार्टचे डायरेक्टर एन .भास्करन यांच्या हस्ते एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल मधील सर्जिकल युनिटचे लोकार्पण

Next Post

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

Related Posts

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026
वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

July 31, 2026
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 26, 2026
सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

May 17, 2026
Next Post
आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In