Monday, June 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर महापालिकेतील स्विकृत नगरसेवकांच्या निवडी; ‘हे’ आहेत स्विकृत शिलेदार

Hello Solapur by Hello Solapur
21-Feb-2026 12:57 pm
in राजकारण
0
0
SHARES
598
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली. भाजपकडून 9 पैकी 8 स्विकृत सदस्यांची घोषणा करण्यात आली. या निवडीनंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यामध्ये भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, पत्रकार मनिष केत, अक्षय अंजीखाने, वृषाली चालुक्य, ज्ञानेश्वर म्याकल, श्रीनिवास दायमा, हृषीकेश मेट्रे आणि रुद्रेश बोरामणी यांची निवड करण्यात आली. तसेच एमआयएमकडून नय्युम सालार यांची स्विकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.

यंदा स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांसाठी महापालिका आयुक्तांकडे एकूण 62 अर्ज दाखल झाले होते. यापैकी पात्रतेच्या आधारे आणि पक्षीय निर्णयानुसार 10 जणांची निवड करण्यात आली आहे. यात भाजपकडून तब्बल 9 स्वीकृत नगरसेवकांना संधी मिळाली असून, एमआयएम पक्षाला 1 जागा मिळाली आहे.

भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांच्या यादीत पक्षातील पदाधिकारी, निष्ठावंत कार्यकर्ते तसेच आमदार देवेंद्र कोठे यांच्या समर्थकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचे पाहायला मिळत आहे.

या निवडीमुळे भाजपने संघटनात्मक मजबुतीला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट होत आहे.
यंदाच्या यादीत भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे.

यासोबतच पत्रकारिता क्षेत्राचे प्रतिनिधित्व म्हणून मनीष केत यांचीही स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली असून, विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींना संधी देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आल्याचे चित्र आहे.

दरम्यान, एमआयएम पक्षाकडून नय्युम सालार यांची एकमेव स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेतील एमआयएमच्या भूमिकेकडेही आता लक्ष वेधले जाणार आहे.

स्वीकृत नगरसेवकांच्या या निवडीमुळे सोलापूर महापालिकेतील राजकीय समीकरणे अधिक बळकट झाली असून, आगामी काळात महापालिकेच्या कामकाजात सत्ताधारी भाजपचा प्रभाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शहराच्या विकासकामांवर आणि धोरणात्मक निर्णयांवर या स्वीकृत नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Tags: Bjp SolapurBreaking newshello solapurManish KetSolapur bjpsolapur mahapalikasolapur news
Previous Post

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

Next Post

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

Related Posts

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026
Next Post

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In