सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापुरात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे सरसावल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील उदय फाउंडेशन आणि नाम फाउंडेशनकडून मोहोळ तालुक्यात पूरग्रस्तांना जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले आहे.
मोहोळ तालुक्यातील घाटणे, कोळेगाव, खरकटने, मालिकपेठ यासह अनेक गावात जीवनावश्यक कीटचे वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने पिण्याचे पाणी बॉक्स, लहान मुलांचे डायपर, कांदे, बटाटे, आटा, साखर, चहा पावडर यासह आदींचा समावेश आहे.
त्याचबरोबर पूरग्रस्त 86 गावामध्ये साफ सफाईचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये जेसीबी, पोकलेन तसेच मनुष्यबळ पुरवून साफ सफाई करण्यात येणार असल्याची माहिती उदय फाउंडेशनच्या नागेश वनकळसे यांनी दिली.









