Saturday, April 18, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

Hello Solapur by Hello Solapur
17-Apr-2026 21:12 pm
in राजकारण
0
0
SHARES
99
VIEWS

HELLO SOLAPUR | केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयकासाठी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महिला आरक्षणाशी संबंधित तीन विधेयकांपैकी पहिले असलेले डिलिमिटेशन (सीमांकन) विधेयक संसदेत फेटाळले गेले आहे. यामुळे मोदी सरकारला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

सदर विधेयकाच्या बाजूने 298 मते, तर विरोधात 230 मते पडली. मात्र हे विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली दोन तृतीयांश (2/3) बहुमताची अट पूर्ण झाली नाही, त्यामुळे ते नामंजूर करण्यात आले.

काय आहे मुख्य कारण?

डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्यासाठी साध्या बहुमतापेक्षा जास्त, म्हणजेच दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. जरी सरकारला संख्याबळ मिळाले, तरी आवश्यक टक्केवारी न गाठल्याने विधेयक पारित होऊ शकले नाही.

राहुल गांधींची प्रतिक्रिया :

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले:

“आम्ही आधीच स्पष्ट सांगितलं होतं की हे खरं महिला आरक्षण विधेयक नाही. हे देशाच्या निवडणूक व्यवस्थेवर परिणाम करणारे आहे. 2023 चे महिला आरक्षण विधेयक लागू करा, आम्ही तुम्हाला 100 टक्के समर्थन देऊ.”

पंतप्रधान मोदींची भूमिका :

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात या विधेयकाला विरोध केल्यास देशातील महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. मात्र विरोधी पक्षातील खासदारांनी मोठ्या संख्येने विरोधात मतदान केल्याने विधेयक फेटाळले गेले.

पुढील हालचाली :

डिलिमिटेशन विधेयक फेटाळल्यामुळे उर्वरित दोन विधेयके आज मांडली जाणार नाहीत. त्यामुळे लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

दरम्यान दिल्लीमध्ये भाजप आणि एनडीए नेत्यांची तातडीची बैठक सुरू असून पुढील रणनीतीवर सध्या चर्चा सुरू आहे.

राजकीय परिणाम :

पहिल्याच टप्प्यात विधेयक फेटाळल्यामुळे केंद्र सरकारची प्रतिमा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. विशेषतः महिला आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर झालेली ही घडामोड आगामी राजकारणावर परिणाम करू शकते.

Tags: BjpCongressDelhiDelimitation billhello solapurNDAPM Narendra ModiRahul Gandhi
Previous Post

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

Related Posts

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In