Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

Hello Solapur by Hello Solapur
26-Jul-2026 22:27 pm
in जिल्हा
0
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन
0
SHARES
57
VIEWS

चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

HELLO SOLAPUR NEWS | नीरा नदीच्या पात्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि वीर धरण भरल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आज दि. २५ जुलै २०२६ रोजी दुपारी २.०० वाजल्यानंतर पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने देण्यात आली आहे. 

वीर धरण यापूर्वीच पूर्ण क्षमतेने भरले असल्याने अतिरिक्त पाण्याचा साठा करणे शक्य नाही. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. दि. २२ जुलै २०२६ रोजी ४६०० क्युसेकने सुरू झालेला विसर्ग दि. २४ जुलै २०२६ पासून १५ हजार क्युसेक करण्यात आला असून तो आता २५ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पाण्याचा निचरा नीरा नदीमार्गे भीमा नदीत होत असून त्याचा थेट परिणाम चंद्रभागेच्या पातळीवर होणार आहे. 

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपूर शहरातील भाविक-वारकरी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आज दुपारी २ नंतर पाणीपातळीत सातत्याने वाढ होणार असल्याने कोणत्याही नागरिकाने नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन अधीक्षक अभियंता, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण (पाटबंधारे विभाग) सोलापूर यांनी केले आहे. 

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे चंद्रभागा किनारी आणि वाळवंटात विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. 

Tags: Bhima RiverChandrabhaga Riverhello solapurHello Solapur NewsJaykumar GorePandharpurPandharpur NewsSolapur collectorUjani Dam
Previous Post

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

Next Post

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

Related Posts

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

आमदार राजेंद्र राऊत हे भाजपचे बाजीप्रभू देशपांडे; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून कौतुक

August 3, 2026
डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

डीसीसी बँकेवरून आमदार राजेंद्र राऊतांची आमदार दिलीप सोपलांवर टीका तर राजन पाटलांची मात्र जाहीर माफी

August 3, 2026
वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

July 31, 2026
सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

May 17, 2026
Next Post
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In