Saturday, August 1, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

Hello Solapur by Hello Solapur
31-Jul-2026 19:39 pm
in जिल्हा
0
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला
0
SHARES
84
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | PANDHARPUR | उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने दुपारी 4.00 वाजता उजनी धरणातून 80 हजार क्युसेक्स तर वीर धरणातून 63 हजार 323 विसर्ग असा एकूण 1 लाख 43 हजार 323  क्युसेक्स इतका विसर्ग  सुरु आहे. वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा निरा नरसिंहपुर (संगम) येथे भीमा नदीत मिसळत असल्याने नीरा व भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक  काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी  सचिन इथापे यांनी केले आहे.
        उजनी व निरा संगमाचा  विसर्ग भीमा नदीपात्रात एकत्रित पोहोचणार असल्याने धोक्याची पाणी पातळी वाढ होण्याची  शक्यता आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांनी  भीमा  नदीकाठच्या सखल गावांना व वाड्यावस्त्यांना तसेच पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी काठच्या नागरिकांना  तात्काळ सतर्कतेचा इशारा द्यावा. नदीपात्रातील जनावरे, इलेक्ट्रीक पंप  हलवावे गाव पातळीवर दौंडीद्वारे जाहीर सूचना द्याव्यात.

पोलीस प्रशासनाने घाटावर व नदीपात्रात प्रवेश बंदीची अंमलबजावणी सुरू करावी. वाळवंट परिसरातील वारकरी भाविक यांना नदीपात्रातून दूर हलवावे. गस्त वाढवून आवश्यक तेथे बॅरिकेटिंग करावे . पाटबंधारे विभागाने दर तासाला पाणी पातळी व धरणातील विसर्ग बाबत अद्यावत माहिती नियंत्रण कक्षास कळवावी. आरोग्य विभागाने नदीकाठच्या उपकेंद्रावर आपत्कालीन वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी तसेच मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा. वीज वितरण विभागाने नदीकाठचे विद्युत वाहिन्या रोहित्र तपासून आवश्यकतेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याबाबत आवश्यकती कार्यवाही करावी.

नगरपालिका प्रशासनाने सकल भागातील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र व ड्रेनेज पंप तपासावेत व तात्पुरती निवारा केंद्र सज्ज ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीत बोट व जीव रक्षक साहित्य करावे. नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवावा. पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरपरस्थितीत नदीपात्रावरील घाट व प्रवेश बंद ठेवावा. सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील व नदीकाठावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळवावी. भीमा नदी पात्रात पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये सर्व विभागांनी पूरनियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी  अशा सूचना ही प्रांताधिकारी सचिन  इतापे यांनी दिल्या
             
  पाण्याखाली जाण्यास  सुरवातीचा विसर्ग क्युसेक्स चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग 26 हजार क्यूसेक्स असल्यास सोलापूर- पंढरपूर रस्त्यावरील जुना दगडी पूल पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग 35 हजार क्यूसेक्स असल्यास पंढरपूर नगरपालिका बंधारा पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग 40 हजार क्युसेक्स असल्यास भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जातात.

पाण्याचा विसर्ग 1 लाख 07 हजार क्यूसेक्स असल्यास पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावरील जुना गोपाळपूर पूल पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग 96 हजार ते एक लाख 15 हजार क्युसेक्स असल्यास व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरते. तर विसर्ग एक लाख 60 हजार असल्यास पंढरपूर -मंगळवेढा रस्त्यावरील नवीन गोपाळपूर पूल पाण्याखाली जातो. तसेच पाण्याचा विसर्ग एक लाख ३० हजार क्यूसेक्स असल्यास संतपेठ झोपडपट्टीत पाणी शिरते. अशा वेळेस पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी. झोपडपट्टीत पाणी शिरण्याच्या अगोदरच नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे.

Tags: Bhima Riverfloodhello solapurHello Solapur NewsPandharpurPandharpur Newssolapur floodsolapur rainUjani DamUjani Dam Water
Previous Post

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

Next Post

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

Related Posts

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 26, 2026
सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

सोलापूर : हातात तलवार अन् चांदीची वाटी घेतलेल्या बाळबट्टलला पाहण्यासाठी वळसंगमध्ये हजारोंची गर्दी

May 17, 2026

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

2 वर्षांपूर्वी नवरा गेला, आता जगण्याचा आधार असलेली 2 मुलेही शेततळ्यात बुडाली; कुटुंबावर शोककळा

April 13, 2026
Next Post
वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

ताज्या बातम्या

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

वाडिया हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सुविधा कार्यान्वित; 74 बेड्ससह आधुनिक यंत्रणा सज्ज

August 1, 2026
निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

निरा-भीमा नदीवरील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना; भीमा नदीत 1 लाख 43 हजार क्युसेक्स विसर्ग सोडला

July 31, 2026
चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत वाढ; वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In