Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

Hello Solapur by Hello Solapur
10-Mar-2026 20:31 pm
in राजकारण
0
0
SHARES
279
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपकडून महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेत भाजपच्या गटनेतेपदी करमाळा तालुक्यातील झेडपी सदस्य रश्मी बागल यांची निवड करण्यात आली आहे. तर उपनेतेपदी मंगळवेढा तालुक्यातील प्रदीप खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि नुकतेच निवडून आलेले झेडपी सदस्य चेतनसिंह केदार यांच्यावर प्रतोद पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नेताजी खंडागळे यांची जिल्हा परिषदेत प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेत एकूण ६८ पैकी ३८ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्षपद यंदा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे या पदासाठी कोणाला संधी मिळणार याकडे जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे.

यंदा भाजपने गटनेते, प्रतोद आणि प्रवक्ते या तीन पदांवर मराठा समाजाला संधी दिली तर उपनेतेपदी धनगर समाजाला संधी दिली आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणबी सोडून मूळ ओबीसी समाजातील नेत्याकडे जाण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, १८ मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार असून, त्या दिवशी अध्यक्षपदासाठी नेमका कोणता चेहरा पुढे येतो हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत पुढील काही दिवस राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

Tags: Bjp SolapurChetansinh KedarGangadhar Khandagalehello solapurJaykumar Goreminister jaykumar gorePradip KhandekarRashmi BagalsolapurSolapur bjpsolapur bjp ruralsolapur newsSolapur ZPZP ElectionZP News
Previous Post

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Next Post

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

Related Posts

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

August 22, 2026
ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

August 14, 2026
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
Next Post

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In