Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

Hello Solapur by Hello Solapur
05-Mar-2026 12:22 pm
in क्राईम
0
0
SHARES
946
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळातील शिष्यवृत्ती योजनेत मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. बोगस प्रमाणपत्रांच्या साह्याने मंडळातील काही अधिकाऱ्यांनीच तब्बल 3 कोटी 63 लाख रुपये लाटल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी संबंधित 3 अधिकाऱ्यांसह एकूण 20 जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांनी परराज्यात उच्च शिक्षण घेत असल्याचे खोटे दाखले सादर करून शिष्यवृत्तीच्या नावाखाली ही रक्कम काढण्यात आली.

या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोषसिंग राजपूत आणि उज्वल सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे.


सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यात आली. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना राबवली जाते.

या योजनेअंतर्गत कामगारांच्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी दरवर्षी प्रत्येकी सुमारे 60 हजार रुपये शासनाकडून दिले जातात.


सोलापूर जिल्ह्यात सुमारे एक लाखांहून अधिक बांधकाम कामगारांची नोंद आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी 223 लाभार्थ्यांनी आपल्या पाल्यांच्या नावावर शिष्यवृत्तीची रक्कम काढल्याची तक्रार विभागाकडे केली होती.

मात्र, त्या वेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच तत्कालीन कामगार आयुक्तांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी याबाबत विधिमंडळाच्या अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल केला होता. मात्र हा प्रश्न सभागृहात मांडण्यापूर्वीच सहाय्यक कामगार आयुक्तांनी संबंधित तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली.


या घोटाळ्यामुळे बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या योजनांचा गैरवापर झाल्याचे स्पष्ट झाले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags: hello solapursolapursolapur Bandhkam kamgar scam
Previous Post

राज्यसभेवर खासदार म्हणून सोलापूरच्या नेतृत्वाला संधी; शिवसेना शिंदे गटाने दिला न्याय

Next Post

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

Related Posts

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

सोलापुरात घरकुल परिसरातून फिल्मी स्टाईल एटीएम मशीनच चोरीला

May 16, 2026
NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

NEET परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल; पेपरफुटीचे साईड इफेक्ट

May 16, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026
Next Post

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026
ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

May 18, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In