Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आरपीआयच्या सचिन खरातांची पडळकर, हाके, भुजबळ आणि मुंडेंवर खोचक टीका

Hello Solapur by Hello Solapur
04-Oct-2025 17:56 pm
in राजकारण
0
0
SHARES
18
VIEWS

HELLO SOLAPUR | आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप करत कडाडून टीका केली.

त्याचबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले.  त्याच्याबरोबर पंकजा मुंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागण्याची मागणी केली. यावेळी ओबीसी, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली.

– भुजबळ – मुंडे यांच्यावर टीका :

भुजबळ आणि धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद गेल्यावरच त्यांना ओबीसी समाज आठवतो. मंत्रीपदावर असताना दोघांनीही कधी ओबीसींच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. आता सत्तेबाहेर गेल्यावरच समाजाच्या नावाने राजकारण सुरू केल्याचा आरोप. हे सर्व फक्त स्वार्थासाठी केलेले नाटक आहे.

– पंकजा मुंडे वादग्रस्त वक्तव्य :

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा खरात यांनी निषेध केला. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “पुरामुळे एका बौद्ध कुटुंबाच्या घरात पाणी गेले आणि वंजारी समाजाने मदत केली.” त्यावर खरात यांनी टीका केली, उपकार हा शब्द जातीवादी वर्चस्व दाखवणारा आहे. बौद्ध समाज नेहमी वंजारी समाजासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिला आहे. असे बोलून समाजात फूट पाडली जाते. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी तत्काळ माफी मागावी.

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदत प्रकरण :

शेतकरी मदतीच्या संदर्भात खरात यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. शेतकरी रडत असताना तुम्ही स्वतःचा फोटो लावलेले कीट वाटता, ही जाहिरातबाजी आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी. शेतकऱ्यांचे सरकार आहे असे म्हणताय, तर पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकरी 50 हजार मदत द्या.

– SC वर्गीकरणावर आक्षेप :

सरकारने अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरणाचा विचार मांडल्यावर खरात यांनी तीव्र विरोध दर्शवला. “हे आरक्षण संपूर्ण समाजाला दिले आहे, एका जातीला नाही.” लोकसंख्येनुसार वर्गीकरण करावे, अन्यथा समाजात फूट पडेल. आरक्षण केवळ शिक्षण-नोकरीपुरतेच नव्हे तर राजकारणातही लागू झाले पाहिजे.

– लक्ष्मण हाके यांच्यावर हल्लाबोल :

खरात यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर आरोप केले. “लक्ष्मण हाके आरोपी वाल्मिक कराडची बाजू घेत आहेत, हे लाजिरवाणे आहे. हाके यांच्या पोटात मनुस्मृती आहे आणि तोंडात फुले-शाहू-आंबेडकर नाव आहे.”

– छगन भुजबळ यांना लक्ष्य :

“छगन भुजबळ हे ओबीसी चळवळीचे नेते नाहीत. मंडल आयोगाच्या काळात त्यांचे कोणतेही योगदान नव्हते. १९९२ मध्ये त्यांनी समता परिषद स्थापन केली पण ओबीसी आंदोलनाशी संबंध नव्हता.

– गोपीचंद पडळकरांवर आरोप :

गोपीचंद पडळकर मंत्रिपद मिळण्यासाठी जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत आहेत. भाजप बहुजनांचा वापर करतेय आणि फेकून देते.

गोपीचंद पडळकर तुमच्यापेक्षा माझी भाषा खालची आहे. मी ती बोलू शकतो पाणी मी बोलत नाही. गोपीचंद पडळकर वाईट बोलूनही त्याना साथ मिळते. पडळकरांना आमदारकी मिळाली धनगर समाजाला काय मिळाले?

– 1802 साली हडपसर येथे पेशवाविरुद्ध होळकर लढाई झाली. त्यावेळी पेशवा पळून गेला आणि वसईचा तह केला. हे का नाही सांगत तुम्ही. पेशवे आणि इंग्रजी एकत्र लढले आणि शिंदे, होळकर, भोसले एकत्र लढले.

होळकर घराणे पेशव्याविरोधात लढले आणि गोपीचंद पडळकर तुम्ही पेशव्याजवळ जाऊन त्यांच्या पांघरूनात लपून बसले आहात.

Tags: Breaking newschagan bhujbalDhananjay mundegopichand padalkarhello solapurLaxman hakeObc reservationpankaja mundepoliticssolapur political newsमराठी न्यूजसोलापूर न्यूजहॅल्लो सोलापूर
Previous Post

BREAKING | भाजपच्या या नेत्याने सुपारी दिली; शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा आरोप

Next Post

तुळजापूरला पायी जाणार्‍यांसाठी विश्‍व हिंदु महासंघाकडून ‘ही’ सेवा मोफत देणार

Related Posts

सोलापूर विधान परिषदेसाठी भाजपकडून व्हीप बाजवला!

June 16, 2026
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी SP गटाच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा

June 7, 2026
सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026
Next Post

तुळजापूरला पायी जाणार्‍यांसाठी विश्‍व हिंदु महासंघाकडून 'ही' सेवा मोफत देणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In