Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

बिहारचा पराभव लाडकी बहीण योजनेमुळे झाला : शरद पवार

Hello Solapur by Hello Solapur
16-Nov-2025 19:34 pm
in राजकारण
0
0
SHARES
175
VIEWS

HELLO SOLAPUR |  सामाजिक प्रश्न, बिहार निवडणूक, महापालिका राजकारण, शेतकरी प्रश्नासह अनेक मुद्द्यांवर शरद पवारांनी थेट भाष्य केले आहे.

सोलापूरमध्ये झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज विविध महत्त्वाच्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय विषयांवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. सामाजिक तणावापासून बिहार निवडणुकीपर्यंत, महापालिका निवडणुकीपासून शेतकरी प्रश्नांपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.

बिहार निवडणुकीवर बोलताना शरद पवार म्हणाले, आमची माहिती वेगळी होती, पण निकाल वेगळा आला. मात्र लागलेला निकाल स्वीकारायचा असतो.

लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांद्वारे महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्येही महिलांना थेट लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नगरपालिका निवडणुकीत पैसे वाटतात हे ऐकले होते, पण सरकारमार्फत संपूर्ण महिलांना 10 हजार देणे आम्ही कधी ऐकले नव्हते.

या योजनेचा निवडणुकीवर झालेला परिणाम लोकांनी ठरवावा जर दहा हजार देणे हेच यशाचे कारण असेल, तर आम्हाला बसून विचार करावा लागेल.”

“उद्याच्या 1 ते 19 तारखेपर्यंत संसदेचे अधिवेशन आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह आम्ही या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत.” या विषयावर एक ठोस धोरण ठरवण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

सामाजिक प्रश्नांवर शरद पवार यांनी स्पष्ट मत मांडले, ते म्हणाले सामाजिक प्रश्नावर एका विचाराने चालणारे हे शहर आहे. अलीकडच्या काळात काही शक्ती जात–धर्माच्या नावावर दुरावा निर्माण करत आहेत, हे देशाच्या ऐक्यासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी म्हटले.

समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती रोखण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

नगरपरिषद आणि महापालिका निवडणुका यापूर्वी कधीही नगरपरिषद निवडणुका इतक्या लांबणीवर पडल्या नव्हत्या.”

स्थानिक नेतृत्वाने एकत्र आले पाहिजे, असे पवार यांनी सुचवले. “भाजपला बाजूला ठेवून जिथे एकत्र येता येईल तिथे एकत्र येणे योग्य आहे.”

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “मी त्यांच्या विधानाचे स्वागत करतो.”
यापुढे भाष्य टाळत त्यांनी संयत भूमिका ठेवली.

तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर आलेल्या पत्राबद्दल बोलताना ते म्हणाले की, “पत्र मिळाले हे खरं आहे, पण मी त्यावर विचार केला नाही. एका सहकाऱ्याने मला ते दाखवले.” पत्रकारांनी हा मुद्दा प्रसारमाध्यमांकडे नेल्याची त्यांनी नोंद घेतली. अनेक ठिकाणी बेरोजगारी वाढत असून त्याचा परिणाम तरुण पिढीवर गंभीरपणे होत असल्याचे त्यांनी मान्य केले.

आमदार राजू खरे यांच्याबाबत म्हणाले, “मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही.”आमदारांनी पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊ नये, असे त्यांनी सुचवले.

स्थानिक पक्षांच्या अस्तित्वावर भाष्य करताना पवार म्हणाले, पक्ष असे संपत नसतात, विचार संपत नाही. 1957 मध्ये काँग्रेसचा पराभव झाला होता पण काँग्रेस पुन्हा उभी राहिली, याची आठवण त्यांनी करून दिली.

“गांधी-नेहरू विचार स्वीकारणारी काँग्रेस संपणारी नाही. ती पुन्हा वेगळ्या स्थितीत पोहोचेल.” एकूणच शरद पवार यांनी आज सोलापूरमध्ये विविध ज्वलंत राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर बिनधास्त, थेट आणि सखोल भूमिका मांडली.

Tags: Bihar ElectionBjpNcp Sharad pawar gatNcp Solapursharad pawarSolapur Ncp
Previous Post

अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे निधन; सोलापुरातील नेत्यांकडून शोक संदेश

Next Post

सोलापूरच्या बार्शीजवळ रेल्वे आणि ट्रॅक्टरचा अपघात

Related Posts

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026
Next Post

सोलापूरच्या बार्शीजवळ रेल्वे आणि ट्रॅक्टरचा अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In