Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा रखडलेला भाजप प्रवेश आज होणार; आमदार सुभाष देशमुखांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Hello Solapur by Hello Solapur
18-Dec-2025 09:31 am
in राजकारण
0
0
SHARES
546
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात आज मोठी घडामोड घडणार असून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा बहुचर्चित व रखडलेला भाजप प्रवेश आज अखेर निश्चित झाला आहे.

आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात दिलीप माने हे आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून या पक्षप्रवेशाबाबत जोरदार चर्चा सुरू होती, मात्र अंतर्गत विरोधामुळे हा प्रवेश रखडलेला होता.

विशेष म्हणजे, भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे हा पक्षप्रवेश होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

मात्र आता आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय गणिते जुळवत दिलीप माने यांचा पक्षप्रवेश निश्चित केल्याचे चित्र आहे.

दोन दिवसांपूर्वी दिलीप माने यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच त्यांच्या भाजप प्रवेशावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापूरच्या स्थानिक राजकारणात मोठे समीकरण बदलण्याची शक्यता असून, महापालिका निवडणुकीआधी हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान या प्रवेशानंतर आमदार सुभाष देशमुख नक्की काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे





Tags: BjpBjp SolapurDakshin SolapurDilip ManeEx MLA Dilip Manehello solapurMahapalika ElectionMahapalika Newsmla subhash deshmukhsolapursolapur mahapalikaSolapur Mahapalika Election 2026solapur newssolapur political newsआमदार सुभाष देशमुखदक्षिण सोलापूरदिलीप मानेहॅलो सोलापूर
Previous Post

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; शाळा – महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

भाजपकडून सोलापूर महापालिकेसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे मोठी जबाबदारी

Related Posts

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026
Next Post

भाजपकडून सोलापूर महापालिकेसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे मोठी जबाबदारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In