Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

भाजपकडून सोलापूर महापालिकेसाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे मोठी जबाबदारी

Hello Solapur by Hello Solapur
18-Dec-2025 18:22 pm
in राजकारण
0
0
SHARES
460
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा करण्यात आली असून, अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सोलापूर महापालिका निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. आगामी निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आतापासूनच तयारीला वेग दिला असल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट होते.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे संघटन बांधणीचा चांगला अनुभव असून, जिल्ह्यातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी यापूर्वीही प्रभावी भूमिका बजावली आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने प्रभागनिहाय आढावा, इच्छुक उमेदवारांची चाचपणी, कार्यकर्त्यांचे संघटन, प्रचाराची आखणी आणि निवडणूक रणनीती आखण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, येणाऱ्या निवडणुकीत सोलापूर महानगरपालिकेत भाजप सत्ता स्थापनेसाठी आक्रमक रणनीती राबवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, सोलापूर महापालिका निवडणूक भाजप स्वबळावर लढवण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात सोलापूरच्या राजकारणात हालचालींना वेग येणार असून, इतर पक्षांच्या रणनीतीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: BjpBjp SolapurBreaking newshello solapurMahapalika NewsMarathi newsmla devendra kotheMla Sachin Kalyanshettymla subhash deshmukhmla Vijaykumar DeshmukhsolapurSolapur bjpSolapur Citysolapur mahapalikaSolapur Mahapalika Election 2026solapur news
Previous Post

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा रखडलेला भाजप प्रवेश आज होणार; आमदार सुभाष देशमुखांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Next Post

काँग्रेसचा आणखी एक उच्चशिक्षित माजी नगरसेवक भाजपच्या गोटात; प्रवेशाची अधिकृत घोषणा उद्या

Related Posts

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026
Next Post

काँग्रेसचा आणखी एक उच्चशिक्षित माजी नगरसेवक भाजपच्या गोटात; प्रवेशाची अधिकृत घोषणा उद्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In