Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

शिवस्मारकतर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन; शाळा – महाविद्यालयांनी सहभागी होण्याचे आवाहन

Hello Solapur by Hello Solapur
17-Dec-2025 18:58 pm
in शहर
0
0
SHARES
9
VIEWS

HELLO SOLAPUR | श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कै. अनंतराव कुलकर्णी स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. शिंदे चौकातील शिवस्मारकच्या सभागृहात ही स्पर्धा होणार आहे.

५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी आणि महाविद्यालयीन गट अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा होईल. स्पर्धा मराठी आणि हिंदी भाषेत होणार असून स्पर्धकांनी ८ मिनिटांमध्ये विषय मांडणी करावयाची आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम मुदत २० डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत राहणार आहे.

स्पर्धेसाठीचे गट आणि विषय पुढीलप्रमाणे : गट ५ वी ते ७ वी : विषय – शिवराय आणि त्यांचे सवंगडी, माझी शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा, माझा आवडता खेळाडू भारतमाता आमुची माता, सोलापूरचे चार अमर हुतात्मे.

गट ८ वी ते १० वी : विषय – लाल महालावरील छापा, सोलापूरची खाद्यसंस्कृती, सोलापूर भुईकोट किल्ला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, डीजेमुक्त सोलापूर. महाविद्यालयीन गट : विषय – महाराजांची युद्धनीती, ऑपरेशन सिंदूरचे धाडस, राष्ट्रभक्तीचा महामंत्र वंदे मातरम, धर्मक्षेत्र सोलापूर (तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूरसह), एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मानवतेसाठी वरदान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रसेवेची शतकपूर्ती

स्पर्धेसाठी प्रवेश निशुल्क आहे. प्रत्येक गटातून स्वतंत्र पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम पारितोषिक ३ हजार रुपये, दुसरे पारितोषिक २ हजार रुपये तर तिसरे पारितोषिक १ हजार रुपये देण्यात येणार आहे. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे आयोजित कै. अनंतराव कुलकर्णी स्मृति शालेय व महाविद्यालय जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या अधिकाधिक संघांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने यांनी केले.

या पत्रकार परिषदेस शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर,शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने,संचालक प्रा. देवानंद चिलवंत, संचालक आणि स्पर्धाप्रमुख प्रसाद जीरांकलगीकर, संचालक, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर उपस्थित होते.

Tags: Akkalkot NewsAkluj NewsBreaking newsLatur NewsMadha NewsMarathi newsRangnath BankapurRSS SolapurShivaji MaharajShivsmarak solapursolapursolapur newsVaktrutva Spardha Solapurश्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ
Previous Post

सोलापूरच्या राजकारणात मोठी घडामोड; एमआयएमचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा रखडलेला भाजप प्रवेश आज होणार; आमदार सुभाष देशमुखांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Related Posts

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026
Next Post

काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा रखडलेला भाजप प्रवेश आज होणार; आमदार सुभाष देशमुखांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In