Saturday, April 18, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

Hello Solapur by Hello Solapur
15-Mar-2026 18:43 pm
in क्राईम
0
0
SHARES
142
VIEWS

HELLO SOLAPUR | दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात दगड खाणीत बुडालेल्या दहा वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर तरंगताना आढळून आला. श्रीहर्ष उर्फ यश श्रीहरी हब्बू असे या दुर्दैवी बालकाचे नाव असून रविवारी सकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

त्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी कुटुंबीय व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अत्यंत दुःखद वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कासेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिकणारा यश गुरुवारी (१२ मार्च) दुपारी आपल्या काकांसह आणि त्यांच्या मित्रांसोबत कासेगाव हद्दीतील ब्रह्मनाथ मंदिर परिसरातील दगड खाणीजवळ गेला होता. काकांसह इतर जण पोहण्यासाठी पाण्यात गेले असताना यश काठावर बसला होता. दरम्यान, तोल जाऊन तो पाण्यात पडल्याने बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि सोलापूर तालुका पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस सतत शोधकार्य सुरू होते. यासाठी पाण्यात बोटीद्वारे तसेच खोलवर गळ टाकूनही शोध घेण्यात आला.

दरम्यान, शोधमोहीमेदरम्यान पोलिस उपनिरीक्षक घोडके, पोलिस निरीक्षक देशपांडे, डब्ल्यू.पी.एस.आय. डोंगरीतोट, सुपे मॅडम, तलाठी हुडेवाले, सर्कल अधिकारी माळी तसेच तहसीलदार किरण जगदाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर तसेच एएसआय बाणेवाले हेही घटनास्थळी उपस्थित होते.

यशचा शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ढोले, अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी रावसाहेब मगर, चालक मिलिंद सुरवसे तसेच फायरमन सचिन लोकरे, राजू चिंता, संकेत कुंभार आणि महेश गेंड यांनी मोठे प्रयत्न केले. उच्च दर्जाच्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने सुमारे ७० ते ८० फूट खोलवरही तपासणी करण्यात आली होती.

मात्र, अखेर रविवारी सकाळी यशचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याला बाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

एएसआय बाणेवाले व पोलिस कॉन्स्टेबल अकबर शेख यांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी गावातील शोकाकुल वातावरणात यशवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरातील दगड खाणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Tags: Crime Newshello solapurKasegaon SolapurSolapur crimesolapur newsSolapur Rural Police
Previous Post

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

Next Post

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

March 6, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026
Next Post

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In