Saturday, April 18, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

कर्नाटकमध्ये सोशल मीडियावर बंदी; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Hello Solapur by Hello Solapur
06-Mar-2026 14:59 pm
in क्राईम
0
0
SHARES
351
VIEWS

HELLO SOLAPUR | मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त होत आहे. मात्र याबाबत कर्नाटक सरकारने केवळ चर्चा न करता एक मोठा निर्णय घेतला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
राज्यातील लहान मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढत असल्याने अभ्यासावर परिणाम होणे, मानसिक ताण वाढणे, झोपेच्या समस्या आणि सामाजिक वर्तनात बदल दिसून येत असल्याचे विविध अहवालांमध्ये समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर मुलांचे आरोग्य आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या या प्रस्तावानुसार १६ वर्षांखालील मुलांना फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स (ट्विटर), स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही.

यासाठी नियमावली तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच त्याबाबत सविस्तर धोरण जाहीर केले जाणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.


तज्ज्ञांच्या मते, लहान वयात जास्त वेळ मोबाईल आणि सोशल मीडियावर घालवल्यामुळे मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव, नैराश्य, चिंता आणि आक्रमक वर्तन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पालक आणि शाळांनीही मुलांच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचे काहींकडून स्वागत होत असताना काही जणांनी याची अंमलबजावणी कशी होणार याबाबत प्रश्नही उपस्थित केले आहेत. तरीही मुलांचे मानसिक आरोग्य आणि शिक्षण लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

Tags: Breaking newsFacebookhello solapurInstagramkarnatak CM SiddharamaiyaKarnatak GovernmentSnap ChatSocial MediaSocial Media Bansolapur newsTwitter
Previous Post

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

Next Post

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

Related Posts

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

सोलापूर जिल्ह्यात अज्ञातांनी तरुणीवर ॲसिड फेकले

April 12, 2026

दगड खाणीत बुडालेल्या यशचा मृतदेह चौथ्या दिवशी पाण्यावर; यशच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार?

March 15, 2026

घरगुती गॅसच्या अवैध विक्रीप्रकरणी सोलापूर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल; सिलेंडर देणाऱ्या एजन्सीचाही शोध सुरु

March 12, 2026

BREAKING सोलापूर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती घोटाळ्यातील 20 जणांवर गुन्हा दाखल

March 5, 2026

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026
Next Post

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In