Saturday, April 18, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

Hello Solapur by Hello Solapur
15-Apr-2026 09:32 am
in जिल्हा
0
0
SHARES
268
VIEWS

HELLO SOLAPUR | शिवसेना शिंदे गटाकडून सोलापूर जिल्ह्यात मोठा संघटनात्मक निर्णय घेण्यात आला असून सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

एकदा पक्षात पद मिळाले की ते कायम आपल्याकडेच राहते हा शिवसेना नेत्यांचा गैरसमज आता दूर व्हायला सुरुवात झाली. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील धावत्या दौऱ्यात घेतलेल्या आढावा बैठकीचे हे फलित मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा कार्यकारिणीसोबतच महिला आघाडी, युवासेना आणि इतर सर्व प्रकोष्ठ देखील रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हाप्रमुखांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंतच्या सर्व नियुक्त्या एकाच वेळी रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील संपूर्ण संघटनात्मक रचना शून्य करण्यात आली आहे.

हा निर्णय शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्ष संघटनेत शिस्त राखण्यासाठी आणि आगामी राजकीय रणनीती लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे.

विशेष म्हणजे, कालच शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोलापूरमध्ये आढावा बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान काही पदाधिकाऱ्यांकडून गैरवर्तन झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकारामुळे श्रीकांत शिंदे नाराज झाल्याचेही सांगितले जाते. बैठकीत संघटनात्मक कामकाज, स्थानिक पातळीवरील समन्वय आणि पक्षवाढीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

याच पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाने कठोर भूमिका घेत थेट संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नव्याने आणि अधिक सक्षम टीम उभारण्याचा हा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, या निर्णयानंतर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून पुढील नियुक्त्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नव्या कार्यकारिणीत कोणाला संधी मिळणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

लवकरच नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा होण्याची शक्यता असून, पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बदलांची मालिका सुरूच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: DCM EKNATH SHINDEeknath Shindehello solapurJyoti WaghmareMarathi newsMarathi PoliticsShivsena Shinde gatShrikant Shindesolapur newssolapur political newssolapur politicsSolapur Shivsena
Previous Post

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

Next Post

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

Related Posts

2 वर्षांपूर्वी नवरा गेला, आता जगण्याचा आधार असलेली 2 मुलेही शेततळ्यात बुडाली; कुटुंबावर शोककळा

April 13, 2026

ब्रेकिंग : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली; ‘हे’ आहेत सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी

April 7, 2026

मोहोळमधील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

February 24, 2026

अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

February 5, 2026

सोलापुरातील माजी आमदाराचा मुलीच्या ‘शाही विवाहाच्या थाटा’ला फाटा; खर्च टाळून विनाअनुदानित शिक्षकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात !

January 23, 2026

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत ‘हे’ दिग्गज नेते, त्यांचे कुटुंबीय निवडणुकीच्या मैदानात!

January 21, 2026
Next Post

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; 'मैत्रीसाठी माघार'चे कारण देत तलवार म्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In