Saturday, April 18, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

Hello Solapur by Hello Solapur
16-Apr-2026 14:49 pm
in राजकारण
0
0
SHARES
508
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या निवडीत शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे दबावतंत्र निष्फळ ठरल्याचे चित्र समोर आले आहे. या निवड प्रक्रियेमध्ये अपेक्षित राजकीय ताकद दाखवण्यात म्हेत्रे गट अपयशी ठरला असून, स्वपक्षातील सदस्यांकडूनही अपेक्षित साथ न मिळाल्याने त्यांची राजकीय कोंडी झाल्याचे दिसून आले. तर अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी मात्र किंग मेकरच्या भूमिकेत पाहायला मिळाले.

अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना स्वतःच्या गटातील सदस्यांनीच साथ न दिल्यामुळे ते एकाकी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेषतः त्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या विषय समित्यांमध्ये स्थान मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मात्र शिवसेना शिंदे गटातील सदस्यांनीच पाठिंबा न दिल्याने त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही.

म्हेत्रे यांनी स्थायी समिती, बांधकाम समिती आणि समाजकल्याण समितीत स्थान मिळवण्यासाठी निवडणूक घेण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्ष आकडेवारी पाहता झेडपीतील 68 पैकी तब्बल 60 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचा प्रभाव कमी पडल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय, स्वपक्षातील 8 सदस्यांपैकी 6 सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने म्हेत्रे यांच्या अडचणीत अधिक भर पडली. परिणामी, निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेत माघार घ्यावी लागली.

राजकीय समीकरणांचा विचार करता, जर ही निवडणूक झाली असती तर भाजपचे सर्व उमेदवार विजयी झाले असते आणि शिवसेना शिंदे गटाची मोठी नामुष्की झाली असती, अशीही चर्चा सुरू आहे.

एकूणच, या घडामोडींमुळे सोलापूर जिल्हा परिषदेतील सत्तासंतुलन स्पष्ट झाले असून, भाजपची पकड मजबूत झाल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे.

बुधवारी विषय समित्यांच्या निवडी पार पडल्या. निवड प्रक्रियेपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. जिल्हा परिषदेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने मित्रपक्ष म्हणून शिवसेना (शिंदे गट) सदस्यांना समित्यांमध्ये स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अक्कलकोट तालुक्यातील शिवराज म्हेत्रे आणि प्रविण तानवडे यांनी स्थायी, बांधकाम आणि समाजकल्याण या महत्त्वाच्या समित्यांवर आग्रह धरला.


जी देईल ती समिती स्वीकारा अशी भूमिका भाजपकडून स्पष्ट करण्यात आली होती. तरीही या दोन्ही सदस्यांनी भाजपच्या भूमिकेला विरोध करत अर्ज भरण्याची तयारी दर्शविल्याने राजकीय वातावरण तापले होते.

Tags: Akkalkot NewsAkkalkot PoliticsEx Mla Siddharam Mhetrehello solapurMarathi newsMla Sachin KalyanshettyShivsena Shinde gatSolapur bjpsolapur bjp ruralsolapur newssolapur political newssolapur politicsSolapur ShivsenaSolapur ZPZP Dipak VaidyaZP ElectionZP News
Previous Post

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

Next Post

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

Related Posts

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026
Next Post

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

April 18, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In