HELLO SOLAPUR | NEET परीक्षेबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या आणि परीक्षेच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. NEET परीक्षा रद्द झाल्याने आत्तापर्यंत 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. दिल्ली, राजस्थान आणि गोवा येथील तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीतील आदर्श नगर परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. तर राजस्थानमधील सिकर येथे प्रदीप मेघवाल या विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. याशिवाय गोव्यातील एका विद्यार्थ्यानेही आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
या घटनांमुळे NEET परीक्षेच्या तणावाचा विद्यार्थ्यांवर किती गंभीर परिणाम होत आहे, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना भावनिक आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये, सरकार विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे.
विद्यार्थी आणि पालकांनी मानसिक तणावाच्या काळात समुपदेशनाचा आधार घ्यावा, असं आवाहनही करण्यात येत आहे.
यापूर्वी देखील विविध परीक्षाचे पेपर फुटल्यामुळे रद्द झाल्या होत्या. मात्र अशाप्रकारे कोणीही पाऊल उचलले नसल्याची माहिती समोर आली नाही. मात्र NEET सारखी परीक्षा रद्द झाल्याने 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या आत्महत्येला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित झालाय.











