HELLO SOLAPUR | सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी आमदार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते, कारण भाजपमधील प्रमुख नेते आणि राजेंद्र राऊत यांच्यात उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत होती. अखेर पक्षाने राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
राजेंद्र राऊत हे बार्शीचे माजी आमदार असून, नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे पक्ष संघटन आणि स्थानिक राजकारणातील त्यांची ताकद लक्षात घेऊन भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवल्याची चर्चा आहे.
भाजपच्या उमेदवार यादीतील महत्त्वाचे मुद्दे
- विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपला एकूण ११ जागा मिळाल्या आहेत.
- संभाजीनगरची जागा भाजपने आपल्या वाट्याला घेतली असून, या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच सुरू होती.
- यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ते यांच्या कन्या रेवती सुळे यांचे होणारे सासरे आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या यांना अहिल्यानगर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
- सोलापूरमधून यापूर्वी विधान परिषदेत प्रतिनिधित्व केलेल्या प्रशांत परिचारक यांना यावेळी संधी न देता भाजपने राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे सोलापूर जिल्ह्यातील भाजपच्या राजकारणात त्यांचे वाढते महत्त्व अधोरेखित झाल्याचे मानले जात आहे. आता स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील निवडणुकीत त्यांना किती सहज विजय मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










