Monday, August 24, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

Hello Solapur by Hello Solapur
19-Aug-2026 08:43 am
in महाराष्ट्र
0
ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!
0
SHARES
127
VIEWS

HELLO SOLAPUR NEWS | ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे. या प्रकरणी सोलापुरात नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांनी ही तक्रार दाखल केलीय.

जालना येथे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे. या वक्तव्याचा निषेध करत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री उशिरा सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट घेत नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवल्याचा दावा संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला.

यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले यांच्या तक्रारीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नवनाथ वाघमारे यांच्याविरोधात BNS 2023 मधील कलम 196, 352, 353 आणि कलम 79 अन्वये ऑनलाइन तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी अद्याप या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे की नाही, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या वेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनलताई दास यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: hello solapurHello Solapur Newsmaratha reservationobc leader navnath waghmareObc reservationsambhaji brigadesolapur news
Previous Post

ब्रेकिंग : पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सुषमा अंधारे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर

Next Post

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

Related Posts

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

July 26, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
Next Post
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर निवड

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In