Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

Hello Solapur by Hello Solapur
26-Jul-2026 12:39 pm
in महाराष्ट्र
0
आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण
0
SHARES
0
VIEWS

HELLO SOLAPUR NEW | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभागाने आषाढी वारी २०२६ दरम्यान लाखो वारकरी भाविकांना सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत आजपर्यंत ७ लाख २३ हजार ८२ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवा देण्यात आली आहे.

आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या अध्यात्म, संस्कृती आणि सेवाभावाचा सर्वोच्च सोहळा आहे. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकरी भाविकांच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारत पालखी मार्गापासून पंढरपूरपर्यंत व्यापक आरोग्य यंत्रणा उभी केली. यंदाच्या वारीत प्रथमच एअर ॲम्बुलन्स आणि ‘आरोग्यसंपन्न वारी’ या डिजिटल ॲपच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित करण्यात आल्या.

आरोग्य विभागाने पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ सुसज्ज आयसीयू, १५६ ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’, २१५ आरोग्यदूत, ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टर यांची नियुक्ती केली. पंढरपूरमध्ये २४ तास कार्यरत आयसीयू, दोन दिवसांचे महाआरोग्य शिबिर, मोफत चष्मा वाटप, डिजिटल मॅपिंग, पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, हॉटेल व धाब्यांतील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान आणि व्यापक आरोग्य जनजागृती यांसारख्या विविध सेवा प्रभावीपणे राबविण्यात आल्या.

आजपर्यंत ७ लाख १८ हजार ६३५ बाह्यरुग्णांवर उपचार करण्यात आले असून ४ हजार ४४७ रुग्णांना आंतररुग्ण सेवा देण्यात आली आहे. तसेच १ हजार ५३३ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे. विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे वारकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध झाली.

Tags: aashadhi waricivil hospitalcm devendra fadanvisDevendra Fadanvishello solapurHello Solapur NewsSolapur hospitalSolapur ZP
Previous Post

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

Next Post

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

Related Posts

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
Next Post
पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

ताज्या बातम्या

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

पंढरपूरच्या कॉरिडॉरबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; विठ्ठल-रुक्मिणीच्या साक्षीने दिला शब्द

July 26, 2026
आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

July 26, 2026
सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In