HELLO SOLAPUR | सोलापुरातील परीट समाजाचे युवा नेते राहुल काटकर यांना डीपीडीसीवर घेण्याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिफारस केलीय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिफारस केलेले राहुल काटकर हे जिल्ह्यातील पहिलेच पदाधिकारी आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात हा चर्चेचा विषय विषय ठरलाय.
राहुल काटकर हे ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. सोलापूर जिल्हा डीपीडीसीच्या निवडी अद्याप झाल्या नसल्या तरी काटकर यांची शिफारस केल्याने भाजप वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलीय.
ही शिफारस म्हणजे परीट समाजाच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास असून, समाजाच्या विकासासाठी एक महत्त्वपूर्ण संधी आहे. DPDC च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामांमध्ये समाजाचा सहभाग वाढणार असून शिक्षण, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आदी क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राहुल काटकर यांच्या नेतृत्वाखाली परीट समाजाला सक्षम व प्रभावी प्रतिनिधित्व मिळेल, तसेच समाजाच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संधी उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात परीट समाज सक्रिय भूमिका बजावेल आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी प्रतिक्रिया राहुल काटकर यांनी दिलीय.









