Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

दलित चळवळीतील आक्रमक युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड; सोहन लोंढे यांचे दुःखद निधन

Hello Solapur by Hello Solapur
27-Dec-2025 12:26 pm
in शहर
0
0
SHARES
596
VIEWS

HELLO SOLAPUR | दलित आणि सामाजिक चळवळीतील आक्रमक, अभ्यासू आणि युवकांमध्ये प्रचंड प्रभाव असलेले नेतृत्व सोहन लोंढे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.

हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने दलित, सामाजिक तसेच युवक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


सोहन लोंढे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दलित हक्क, सामाजिक न्याय आणि समतेसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत सातत्याने संघर्ष केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीही त्यांनी ठाम आणि आग्रही भूमिका मांडत विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
‘हॅप्पी युथ क्लब’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी युवकांना संघटित करत सामाजिक कार्याचा मोठा डोलारा उभा केला होता.

शिक्षण, रोजगार, सामाजिक अन्यायाविरोधातील लढे, तसेच सोलापूर शहरातील विविध नागरी व सामाजिक प्रश्नांवर ते नेहमीच अग्रभागी राहिले.
आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

तात्काळ त्यांना सोलापूरमधील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
सोहन लोंढे यांच्या निधनाची बातमी शहरात कळताच अश्विनी सहकारी रुग्णालयात हजारो युवकांनी गर्दी केली. त्यांच्या निधनाने सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जात असून सामाजिक, राजकीय आणि युवक संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.


सोहन लोंढे यांच्या रूपाने अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे, युवकांना प्रेरणा देणारे एक निर्भीड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.

Tags: Breaking newsDalit Movementhello solapurSohan LondhesolapurSolapur Citysolapur news
Previous Post

भाजपच्या दोन्ही आमदारांच्या बैठकीत नक्की काय घडलं?

Next Post

सोलापूर काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Related Posts

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026
Next Post

सोलापूर काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In