Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

लक्ष्मी-विष्णुसह कामगार चाळीतील बी 2 प्रश्न सोडवण्यास प्राधान्य : आमदार देवेंद्र कोठे

Hello Solapur by Hello Solapur
20-Oct-2025 13:21 pm
in राजकारण, शहर
0
0
SHARES
136
VIEWS

HELLO SOLAPUR | आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर मध्ये चे आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडून ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाला सुरुवात झाली आहे.

सोलापुरातील सर्व नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यास आपण कटिबद्ध असून चाळीतील नागरिकांसाठी महत्त्वाचा असलेला बी टू चा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन आमदार देवेंद्र कोठे यांनी नागरिकांना दिले.

आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग क्रमांक १५ मध्ये नागरिकांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मंगल कोल्हे, किसन मेकाले यांची प्रमुख उपस्थिती होती.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या भेटीसाठी सुरू केलेला ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत आमदार देवेंद्र कोठे यांनी रविवारी प्रभाग क्र. १५ मधील लक्ष्मी विष्णू चाळ येथे भेट दिली.

तेथील नागरिकांसोबत संवाद साधत चाळीतील समस्या जाणून घेतल्या. मंजूर विकासकामांची माहिती देत चाळीतील १०० वर्षे जुन्या असलेल्या नारायण तालीम व्यायाम शाळेस भेट देऊन जीर्ण झालेल्या वास्तूच्या नूतनीकरणासाठी तत्काळ २० लाख रुपयांचा निधी देण्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली.

प्रारंभी विष्णू मिल चाळीपासून रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ परिसरातील माता भगिनींच्या हस्ते पूजन करून झाला. यावेळी परिसरातील नागरिकांनी नागरी समस्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांना माहिती दिली.

चाळीतील रहिवाशांसाठी महत्वाचा बी २ चा प्रश्न, ड्रेनेजचा विषय, रस्त्यांची कामे, महिलांसाठी असलेल्या लघु उद्योगांना शासन स्तरावरील मदत मिळवून देण्याबाबत प्रयत्नशील असून ही कामे लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच महादेव मंदिर परिसर विकासासाठी १० लाख रुपये देण्यात येणार असून परिसरातील ड्रेनेजची समस्या सोडविण्यात येणार असल्याचे आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, मंगल कोल्हे, किसन मेकाले गुरुजी ,अरुण रोडगे अरुण भोसले, चंद्रकांत झांबरे, चंद्रकांत मेकाले,अंबादास करगुळे, भाजपाचे मंडल अध्यक्ष नागेश खरात, नागेश सरगम, अजय यादव, गणेश नरोटे, राजाभाऊ डोंगरे, विठ्ठल म्हेत्रे, रणजित कोकाटे श्रवण साबळे, संस्कार नरोटे, अक्षय कोथिंबिरे आदी उपस्थित होते.

Tags: B2 IssueDevendra KotheDilip Kolhehello solapurLaxmi Vishnu Chawl Issuemla devendra kothesolapurSolapur CitySolapur City Centralsolapur newssolapur political newssolapur politics
Previous Post

सोलापुरात भाजप आमदार लागले कामाला; बापू-मालक एकत्र तर देवेंद्र दादा एकटा बॉस

Next Post

सोलापूर जनता बँक सर्व घटकातील लोकांसाठी काम करते; अध्यक्ष सुनील पेंडसे यांचे दीपावली स्नेहमिलनात प्रतिपादन

Related Posts

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026
Next Post

सोलापूर जनता बँक सर्व घटकातील लोकांसाठी काम करते; अध्यक्ष सुनील पेंडसे यांचे दीपावली स्नेहमिलनात प्रतिपादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In