Thursday, September 10, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

Hello Solapur by Hello Solapur
19-May-2026 20:03 pm
in महाराष्ट्र
0
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक
0
SHARES
8
VIEWS

HELLO SOLAPUR | अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या वतीने दिनांक २० मे २०२६ रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक देण्यात आली आहे. औषध विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती राज्यसंघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिली.

शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारने Drug Price Control Order (DPCO) 2013 अंतर्गत काही जीवनावश्यक औषधांवर होलसेलरला ८ टक्के व रिटेलरला १६ टक्के नफा, तर अनियंत्रित औषधांवर होलसेलरला १० टक्के व रिटेलरला २० टक्के नफा निश्चित केला आहे. मात्र, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून २० ते ४० टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देऊन अव्यवस्थित स्पर्धा निर्माण केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

या परिस्थितीमुळे देशातील सुमारे १२.५० लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून अनेक मेडिकल दुकाने बंद होण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

संघटनेने सरकारकडे DPCO 2013 अंतर्गत नियंत्रित नफ्याची तरतूद मागे घेण्याची मागणी केली आहे. तसेच औषध विक्रेत्यांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाऐवजी Brand Substitute औषधे देण्याचा अधिकार द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. यामुळे औषध विक्रेते कॉर्पोरेट कंपन्यांशी प्रभावीपणे स्पर्धा करू शकतील, असे संघटनेचे म्हणणे आहे.

जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, संबंधित केंद्रीय मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तसेच पंतप्रधान Narendra Modi यांनाही निवेदन देण्यात आले, मात्र त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, राज्यसंघटनेचे सचिव अनिल नांदूर यांनी महाराष्ट्रात हा बंद १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त केला. लोकशाही मार्गाने केलेल्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे सभासदांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

सरकारने औषध विक्रेत्यांच्या मागण्यांवर योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.

Tags: Breaking newshello solapurMedical BandMedical CloseMedicine and Drugs Associationsolapursolapur news
Previous Post

ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी रोहित पवारांना धु धु धुतला; पक्ष विलीनीकरण ते भाजप प्रवेशापर्यंत सगळंच काढलं

Next Post

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

Related Posts

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

ओबीसी नेते वाघमारेंवर सोलापुरात ऑनलाईन तक्रार दाखल!

August 19, 2026
आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

आषाढी वारीत 7 लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; एअर ॲम्बुलन्स ठरले आकर्षण

July 26, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026
Next Post
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

'राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात' हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर; संस्थापक अध्यक्ष राजेंद्र हजारे यांची माहिती

August 23, 2026
महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावण्यास मंजुरी; विश्‍वनाथ चाकोते यांची माहिती

August 22, 2026
राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

राष्ट्रवादीचे नेते प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला वैद्यकीय जामीन मंजूर

August 22, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In