HELLO SOLAPUR | सोलापूरमधून मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची युती निश्चित झाली आहे. याबाबत हॉटेल लोटस येथे युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या युतीबाबत राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे
आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे
यांच्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती. महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील युतीची बोलणी पुढे न सरकल्याने
शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती.
तर दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला होता.
मात्र काल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोलापूर दौऱ्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील युतीच्या हालचालींना वेग आला.
आज दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली असून
या बैठकीत युती निश्चित झाल्याची माहिती समोर आली होती त्यावर आता शिक्का मोर्तब झालाय.
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र मैदानात उतरले आहेत.
या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून 51 – 51 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. सोलापूरच्या राजकारणात मोठा बदल घडवणारी ही घडामोड असून आगामी महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी
शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या युतीची अधिकृत घोषणा माजी मंत्री शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी केली.
या युतीअंतर्गत दोन्ही पक्षांनी समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून प्रत्येकी ५१ – ५१ जागांवर निवडणूक लढवली जाणार आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.
नगर विकास खाते आणि अर्थ खाते आमच्या पक्षांच्या नेत्यांकडे असल्यामुळे महानगरपालिकेच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, भाजपसोबत युतीबाबत चर्चा झाली होती.
भाजपकडे ४० जागांची मागणी करण्यात आली होती, मात्र भाजपकडून केवळ ८ जागांची ऑफर देण्यात आली.
आम्ही किमान २६ जागांवर ठाम होतो, मात्र पुढील चर्चा न झाल्याने अखेर भाजपसोबत युती न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोलापूर महापालिका निवडणुकीत आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र ताकदीनिशी मैदानात उतरणार आहेत.











