Thursday, May 21, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

दिवाळीत ‘बोम्मारील्लू’ सजवा, बक्षीसे मिळवा; पद्मशाली समाजाची अनोखी स्पर्धा

Hello Solapur by Hello Solapur
13-Oct-2025 16:48 pm
in शहर
0
0
SHARES
146
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापुरातील पूर्व भागात दिवाळीला लहान मुली ‘बोम्मारील्लू’ मध्ये (भातुकलीच्या खेळात) आवर्जून रमतात. लहान मुलींच्या खेळणीतील स्वयंपाकघर आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ, आकर्षक लहान भांडी, आधुनिक साधने, सामाजिक प्रबोधनपर सजावटीद्वारे ‘बोम्मारील्लू’ सजविला जातो. एकप्रकारे भावी कौटुंबिक व सामाजिक जीवनाचे दायित्व पेलण्यासाठी लहानपणीचा हा ‘बोम्मारील्लू’ संस्कार उपयोगी ठरतो.

पाहुणचार ‘बोम्मारील्लू’साठी बनवलेल्या दिवाळीचा पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांना खायला हमखास देतात. यामुळे लहान मुलींचे कौतुकाचा विषय होतो. आजच्या काळात कुटुंबे विभक्त होत असताना ही संस्कृती लोप पावते का.?

कौटुंबिक संस्कृती, संस्कार, परंपरा, चालीरिती आणि वारसा याची जपणूक पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी, सक्षम कुटूंब आणि सामाजिक जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी ‘बोम्मारील्लू’द्वारे सामाजिक संदेश देण्यात यावा म्हणून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन व पद्मशाली सखी संघम तर्फे ‘आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपणच जपूया’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘बोम्मारील्लू’ सजवा, बक्षीसे मिळवा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा व सखी संघम’च्या अध्यक्षा कल्याणी पेनगोंडा यांनी माहिती दिली.

या स्पर्धेसाठी नियम पुढीलप्रमाणे आहेत  –
॰ ‘बोम्मारील्लू’चे फोटो पाठवून त्यासोबत मोबाईल नंबरसह पत्ता पाठवणे आवश्यक आहे.
॰ परीक्षक फोटो पाहून किंवा गरज वाटल्यास प्रत्यक्षात भेट देतील.
॰ ‘बोम्मारील्लू सजावटी’ सोबत सामाजिक संदेश देण्यात यावे.
– परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
– प्रथम क्रमांक – ‘लेडीज घड्याळ’ – श्री. श्रीधर सुरा – सदस्य – अखिल भारत पद्मशाली अन्नसत्रम (यादगिरीगुट्टा – यादाद्री) यांच्या वतीने
द्वितीय क्रमांक – ‘ट्रव्हल बॅग’ – सौ. शोभा मधुकर अल्ले यांच्या तर्फे
तृतीय क्रमांक – ‘इस्त्री’
सौ. राधिका दत्तू पोसा (माजी नगरसेविका) यांच्या कडून 
– ‘उत्तेजनार्थ बक्षीसे’ – एकूण 3 बक्षीसे असून सखी फॅशन कॉर्नर तर्फे प्रो. मनोज पिस्के यांच्या वतीने ‘आकर्षक गिफ्ट’.

या स्पर्धेसाठी फोटो पाठवण्याची अंतिम तारीख शुक्रवार दि. २४ ऑक्टोंबर असून विनामूल्य (नि:शुल्क) आहे.

स्पर्धकांनी 9021551431 या व्हाटस्ॲप क्रमांकावर पाठवावेत. ‘परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यावी’.

‘पद्मशाली सखी संघम’* तर्फे
रविवार दि. २६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता ‘हेअर स्टाईल’ (केशरचना) कार्यशाळा.

महिलांना प्रत्येक सणासुदीला आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने सजन्याची भारी हौस असते. त्यासाठी ‘हेअर स्टाईल’ सुध्दा (केशरचना) अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

यासाठी ‘माफक फी’ असून यामध्ये ‘पाच प्रकारांचे हेअर स्टाईल’ ब्युटिशियन अश्विनी संगा – कुरापाटी या कर्णिक नगर, यल्ललिंग मठ जवळील ‘सुवि सभागृह’ येथे शिकवणार आहेत.

अधिक माहितीसाठी +917385283012 या क्रमांकावर संपर्क साधावेत. आणि दोन्ही कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनचे प्रेसिडेंट लक्ष्मण दोंतूल, उपाध्यक्ष- श्रीनिवास कामूर्ती – नागेश पासकंटी – नागेश सरगम, सल्लागार सुकुमार सिध्दम – दयानंद कोंडाबत्तीनी, श्रीनिवास रच्चा, समन्वयक किशोर व्यंकटगिरी, श्रीनिवास पोटाबत्ती, वैकुंठम् जडल सखी संघम’चे उपाध्यक्षा कु. लक्ष्मी यनगंदूल, सचिवा कु. रुचिरा मासम, कार्याध्यक्षा सविता येदूर, सहसचिव वनिता सुरम – अंजली वलसा – श्रावणी कनकट्टी, खजिनदार गीता भूदत्त, सहखजिनदार हेमा मैलारी, समन्वयिका सुनीता निलम (क्यामा) – पल्लवी संगा – ममता तलकोकूल, कार्यकारिणी सदस्या सुलोचना माचरला, मंजुळा दुधगुंडी, संगीता सिद्राल, सुप्रिया मासम, लता जन्नू, रजनी दुस्सा, प्रियंका अडगटला, लावण्या मच्छा, पुर्णिमा कंदीकटला, अमृता सो. रच्चा यांनी केले आहे.

Tags: BommarilluEast Solapurhello solapurPadmashaliPadmashali sangham solapurPurva BhaagShri Markandey SociaFoundationsolapursolapur newsTelagu cultureबोम्मारील्लूमराठी न्यूजमराठी भाषासोलापूर न्यूजहॅलो सोलापूरहॅल्लो सोलापूर
Previous Post

ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली

Next Post

सोलापूर महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने लढणार; पुण्यातील बैठकीत निर्णय : शहराध्यक्ष संतोष पवार

Related Posts

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

April 20, 2026

सोलापुरातील उद्योजकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आणखी एक गिफ्ट; आमदार देवेंद्र कोठेंचा पाठपुरावा यशस्वी

March 30, 2026

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026
Next Post

सोलापूर महापालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने लढणार; पुण्यातील बैठकीत निर्णय : शहराध्यक्ष संतोष पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In