Friday, April 17, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ब्रेकिंग : गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ विधानावर भाजपच्या प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया

Hello Solapur by Hello Solapur
13-Oct-2025 10:57 am
in राजकारण
0
0
SHARES
99
VIEWS

HELLO SOLAPUR | भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांसोबतच मित्र पक्षाच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ठाकरे बंधूंची भेट तसेच रवींद्र धंगेकर यांना टोला लागवला.

विजय वडेट्टीवारांच्या व्हायरल व्हिडीओवर टीका :

प्रत्येकाचं सोयीचं राजकारण सुरू आहे. जाते राजकारण होऊ नये. सरकार योग्य भूमिका घेत असून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करते.

मात्र काही लोकांना राजकीय दुकानदार करायच्या आहेत ते लोक आधी एक आणि आता एक अशी भूमिका घेत आहेत. विजय वडेट्टीवार हे जसं वारं वाहील त्याप्रमाणे वाहत असतात.

– बदलापुरात शिंदे गटाला धक्का :

महायुतीच्या संदर्भात तीनही नेते,  पक्ष आग्रही आहोत. ती आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख म्हणून त्यांनी भूमिका स्पष्ट केली की महायुती म्हणून लढायचं आहे.

स्थानिक लेवलला सगळेच तुल्यबळ असतील तर सामोपचाराने त्या निवडणुका लढवल्या जातील. मात्र कोणावर काही ठिकाणी होणार नाहीत अशी समंजस भूमिका तीनही पक्षांची आहे. आमची सर्वांची मानसिकता सर्व ठिकाणी युती म्हणून लढायची आहे.

– धर्मराव आत्राम यांच्या आरोपाला उत्तर :

भाजपने कुरघोडी केली याबाबत यांच्या बोलण्यातील सत्यता पडताळण्याची गरज आहे. कोणी स्टेटमेंट दिलं की ते झालं असे मानायचं कारण नाही.

राजकारणात भाजपचा इतिहास तपासला तर सोबत राहून कधीच कुरघोड्या करणार नाहीत. राज्याचे समंजस नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. महायुती सरकार चालवायचं असते तेव्हा सर्वांना विश्वासात घेऊन कामं करावं लागतं, देवेंद्र फडणवीस ते करत आहेत.

– रवींद्र धंगेकरांवर टीका :

रवींद्र दंगेकरांना वेसन घालण्याची आवश्यकता होती. पहिले सुटारू होते आता   एकनाथ शिंदेंकडे असल्यामुळे त्यांना शिस्तीत राहावे लागेल.

– माझा वाढदिवस मी शेतकऱ्यांना मदत करुन करणार :

आज महाराष्ट्रतला शेतकरी उध्वस्त झालंय, जमिनी खरवडल्या आहेत, गुरा-ढोराचं नुकसान झालं. त्यामुळे वाढदिवस, उत्सव साजरा करणे मला संयुक्तिक वाटलं नाही. म्हणून धाराशिव जिल्ह्यातील वागेगव्हाण नावाचे गाव आहे, जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारून त्या गावात आम्ही मदत करतोय

तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधतोय, तिथल्या परिस्थितीची पाहणी करून सरकारने दिलेली पॅकेजबद्दल माहिती देणे. शेतकऱ्यांच्या सूचना या फडणवीस साहेबापर्यंत पोहोचवणे, या साठी आजचा दौरा करतोय

– हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका :

एकदम एका मंडल अध्यक्ष एवढं पण हे नेतृत्व वाटतं नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला या महाराष्ट्रमध्ये कोण सिरीयस घेत नाही अशा प्रकारे जर ते बोलले नसते तर त्याची बातमी देखील तुम्ही केली नसती. त्यामुळे असं कायतर वायफळ बोलायचं आणि बातमीत राहायचं, शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं यांचं काम आहे

देवेंद्रजी अशा वायफळ बोलणाऱ्या लोकांकडे लक्ष देतं नाही, आम्ही ही देतं नाहीत. देवेंद्रजीची मोडस काय आहे हे महाराष्ट्र 20-25 वर्षांपासून पाहतोय. मागच्या पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काय कार्य केलं त्यांची कार्यपद्धती महाराष्ट्रला माहिती आहे.

दोन्ही पक्षाना सोबत घेत महाराष्ट्र विकासाकडे नेतायत हे सगळ्यांना माहिती आहे. सपकाळच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. आम्ही त्याची दखल घेत नाही

– गोपीचंद पडळकर यांचे मुस्लिमविरोधी विधान :

मी काही ते विधान ऐकलेले नाही, तो संदर्भ तपासून मग मी यांसदर्भात बोलेन.

– कर्नाटक संघ बंदी :

देशहिताचे, राष्टभक्तीचे चांगले विषय असतील आणि त्याचं शिक्षण कुठं दिलं जातं असेल तर पोटात दुखायचे काही कारण नाही. शेवटी सरकारं हे देश हितासाठी, राष्ट्रभक्तीसाठी काम करतात आणि जर चांगले विचार हे केवळ संघाच्यामाध्यमातून येतायत म्हणून नाक मुरडण्याचे कारण नाही, चांगल्या विचारांचे स्वागत केलं पाहिजे

– ऑन एकनाथ शिंदे योजना :

घरं-संसार चालवताना बजट बघतो आणि त्याप्रमाणे नियोजन करतो. राज्यसरकार हे एक कुटुंब आहे, त्यांना कुटुंब चालवायचं असतो. ते चालवायचं असताना आजची प्रयोरिटी काय हे प्रयोरिटी बघून निर्णय होतात

शेतकरी आज उध्वस्त झालंय त्यामुळे त्यांच्यासाठी तीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलंय. लोकांच्या पैशातून लोकांना द्यायचं असतं, त्यामुळे काही योजना येतात, काही थांबतात, पुन्हा नव्याने सुरु होतात त्याचं राजकारण करण्याची गरज नाही. सगळ्या योजना पून्हा पुन्हा त्या ताकदीने जनतेसाठी असतील. B

– ऑन संग्राम जगताप विधान :

त्याच्या मागच्या भावना ही  स्वदेशीला महत्व द्या, आत्मनिर्भर व्हा त्यातून आलेली ती प्रतिक्रिया आहे. स्वदेशी करताना स्थानिक लोकांकडून स्थानिक वस्तू घ्या, ह्या देशात स्थानिक किंवा हिंदुस्थानमध्ये आपण हिंदू म्हणतो तसं ते हिंदूकडून घ्या असं म्हणाले असतील.

त्यामुळे सर्वजण आत्मनिर्भर होतील अशा अनुषंगाने केलेले त्यांचे विधान असावे असं माझं आकलन आहे

– संग्राम जगताप यांना नोटीस :

अजित पवार हे त्याच्या प्रमुख आहेत. त्यांच्या आमदारांना काय करायचं त्यांचा लूकआउट आहे. त्याचे उत्तर काय मिळतं ते पाहू.

– ऑन संग्राम जगताप भाजप निवडणूक :

आता तर आम्ही महायुतीत आहोत. मित्र पक्षाचा आमदार आमच्याकडून लढणार किंवा येणार हे संयुक्तिक नाही. महायुती म्हणून आम्ही लढत आहोत आणि लढणार. मित्र पक्षाच्या आमदाराबाबतीत मी बोलणं उचित नाही.

– ऑन नथुराम गोडसे वक्तव्य :

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे डोके फिरले आहे. तेच माथे फिरू सारखे वल्गना आणि वक्तव्य करत आहे. एवढा बालिश आणि अपरिपक्व प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राने कधी पाहिला नाही..

– ऑन ठाकरे बंधू भेट :

ठाकरे बंधूंच्या भेटीचा अजिबात परिणाम होणार नाही. त्याचं कारण विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने जनाधार दिला आहे. मुंबईत महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे.

मुंबई झपाट्याने बदलत आहे. मुंबईत मेट्रो रेल, कोस्टल रोड प्रकल्पांच्या माध्यमातून प्रगती होत आहे. यातून मुंबईचा चेहरा बदलत आहे. ठाकरे यांना 30-35 वर्षे लोकांनी तपासला आहे. यांनी ना बाळासाहेबांची विचारसरणी जोपासली. ना मुंबई आणि मराठी माणसांचे प्रेम राहिले*

मला आश्चर्य वाटतं. तसं काय युती, आघाडी महाराष्ट्रात कधी झालीच नाही. त्याच्याकडे पाहिलं जात आहे. दोन भाऊ असणे स्वाभाविक आहे. दोन पक्ष आणि दोन नेते आहेत. ही लोकशाहीत असणारी प्रक्रिया आहे.

महायुतीत पण तीन आणि महाविकास आघाडीत पण तीन पक्ष आहेत. यात वेगळं काय घडत आहे. वीस वर्षे झालं कुटुंब एकत्र नव्हतं ते जर एकत्र आले तर राजकीय दृष्ट्या काडीचाही परिणाम होणार नाही.

– अंबादास दानवे यांच्या टिकेला प्रत्युत्तर :

आपण घर चालवत असताना उपलब्ध पैशाचे नियोजन करतो. शेवटी सरकार चालवत असताना प्राधान्याचे विषय कुठले याचा विचार करून सरकार नियोजन करत असतात.

शेतकरी आज अडचणीत आहे त्यापेक्षा मोठं प्राधान्य आहे का? घराच्या घर उध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्याला जगायचं कसं हा प्रश्न आहे अशावेळी शेतकऱ्यांसाठी मोठं पॅकेज दिलं असेल तर थोडा फार तान तिजोरीवर येतो. मात्र पुन्हा हे सरकार योजना सुरळीत करेल.

– वर्षा गायकवाड यांच्यावर टीका :

काँग्रेसची नाराजी असते जाते त्यांना वाटतं ते करतात. नेत्यांच्या नाराजीचा काही नाही कारण जे हाय कमांडला वाटतं तेच होतं. आम्हाला जे वाटतं तेच आम्ही करणार यातच काँग्रेसने अस्तित्व संपवून टाकलं.

– छटपूजा सवलती :

हिंदूंचे प्रत्येक सण उत्सव साजरे झाले पाहिजेत. आपल्या उत्सवांनी ताण पडतो मात्र शेवटी  ताण हाताळण्याची क्षमता मुंबई महापालिकेत आहे. पूजा उत्सव करणाऱ्यांनी चांगलं नियोजन करून यंत्रणांवर ताण पडला नाही पाहिजे हे पहावं.










Tags: BjpBjp Solapurgopichand padalkarhello solapurPravin Darekarsolapur newssolapur political newssolapur politicsसोलापूर न्यूजसोलापूर पॉलिटिक्ससोलापूर राजकारणहॅलो सोलापूरहॅल्लो सोलापूर
Previous Post

स्व. गोपीनाथ मुंडे यांचा वैद्यनाथ कारखाना 104 एकर जमिनीसह 129 कोटीला विकला

Next Post

ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली

Related Posts

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

सोलापूर झेडपीच्या गटनेते, प्रतोद अन् प्रवक्तेपदी मराठा समाजाला संधी; अध्यक्षपद मात्र गुलदस्त्यात!

March 10, 2026

शिवसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत?

March 5, 2026
Next Post

ब्रेकिंग : सोलापूर जिल्हा परिषदेच्या 68 जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

सोलापूर शिवसेनेची शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख सर्वच कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026

ब्रेकिंग : पंढरपूरमधील ॲसिड हल्ला प्रकरणात धक्कादायक वळण; तरुणीने स्वतःच ॲसिड ओतले….

April 13, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In