HELLO SOLAPUR : मराठा समाजासाठी हैद्राबाद गॅझेट लागू केल्यानंतर ओबीसी समाजाने त्याला आक्षेप घेतला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जीआर मधील शब्दांवर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर आता सरकार पुन्हा एकदा हैद्राबाद गॅझेटच्या जीआर बाबत ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करणार आहे.
उद्या 4 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रमुख ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती भाजपचे आमदार परिणय फुके यांनी दिली.
मराठा समाजासाठी काढलेल्या जीआर मध्ये काही बदल होणार का? यावर होणार उद्याच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
या बैठकीत मंत्री छगन भुजबळ, आमदार विजय वडेटीवार, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, बबनराव तायवाडे उपस्थित राहणार आहेत.
त्याचबरोबर ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
दोन सप्टेंबर रोजीचा हैद्राबाद गॅझेट लागू केल्याचा जो जीआर आहे त्याचे नेमके इंटरप्रिटेशन म्हणजे मतितार्थ काय आहे? हे समजून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचेही आमदार फुके यांनी सांगितले.
ओबीसींचे प्रतिनिधी आणि सरकारमध्ये चर्चा होणार आहे. या जीआर मधील सगळ्या विषयाचा तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण कायम राहिले पाहिजे, ओबीसींसाठी अनेक योजना आल्या पाहिजे हे या बैठकीत ठरणार आहे
या जीरआर मुळे ओबीसी समाजात कन्फ्युजन निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी ही बैठक महत्वाची ठरणार आहे. उद्या मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात, सकाळी 11:30 वाजता बैठक होणार आहे.
त्यामुळे सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मान्य केलेल्या मागण्या पुन्हा बदलतेय कि काय हे उद्याच्या बैठकीत ठरणार आहे.










