Saturday, February 28, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

मनपा निवडणुकीसाठी पुरुषोत्तम बरडेंचा ‘उत्तरा’धिकारी ठरला; मात्र पक्ष अद्यापही गुलदस्त्यात

Hello Solapur by Hello Solapur
17-Dec-2025 14:52 pm
in शहर
0
0
SHARES
112
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे यांची कन्या उत्तरा बरडे – बचुटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मंगळवारी झालेल्या बरडे समर्थकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हांडे प्लॉट येथे ही बैठक पार पडली.

या बैठकीप्रसंगी केलेल्या भाषणात पुरुषोत्तम बरडे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले.

या बैठकीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, उत्तरा बरडे – बचुटे, स्वाती रुपनर, वैशाली सातपुते, अर्चना बरडे, लहू गायकवाड, बबलू चौगुले, रणजीत काशीद, दिनकर जगदाळे, सुरेश जगताप, महादेव सलगर, आशुतोष बरडे उपस्थित होते.

पुरुषोत्तम बरडे म्हणाले, गेल्या ३८ वर्षांपासून शिवसेनेच्या विस्तारासाठी विकासासाठी मी अहोरात्र काम केले आहे. अनेक निवडणुकांमध्ये आपला निसटता पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक ७ मधून यंदा मात्र विजय आपलाच आहे.

प्रभाग क्रमांक सातमध्ये विकासाची कामे करण्यासाठी तरुणांना रोजगार देण्यासाठी तसेच व्यसनमुक्त तरुण घडविण्यासाठी उत्तरा बरडे – बचुटे यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असे आश्वासनही पुरुषोत्तम बरडे यांनी याप्रसंगी दिले.

आजवर अनेक निवडणूकीत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. परंतु यंदा गडही येणार आणि सिंहींण देखील येणार, असेही पुरुषोत्तम बरडे याप्रसंगी म्हणाले.

यावेळी उत्तरा बरडे – बचुटे, सुरेश जगताप, स्वाती रूपनर, राजकुमार माने, अतुल कणसे, आशुतोष बरडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस धनराज जानकर, बाळासाहेब माने, शिवाजीराव बचुटे, तानाजी खटके, ज्ञानेश्वर कांबळे, दादा डिगे, राहुल कालेकर, दत्तात्रय देशमुख, अण्णा गवळी, मीनाक्षी गवळी, सचिन सुरवसे, नागेश पडवळकर, योगेश खटके, योगेश क्षीरसागर,  सतीश पवार, अमर जाधव, शाबीर सय्यद, सलीम शेख, धनंजय माळवे, अमर खटके,

कैलास व्हनमाने, गणेश आदमाने, विष्णू जवंजाळ, संदीप भोसले, मारुती खानापूरे, अन्वर मिरजकर, शिवाजी शेवतेकर, अतुल कणसे, अमित डोके, राजाभाऊ कोळेकर, गजाभाऊ पटाडे, सिद्राम मुडे, अस्लम शेख यांसह प्रभाग ०७ मधील विविध भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन नितीन रूपनर यांनी तर आभार समर्थ बरडे यांनी मानले.

राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ :

राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे. या खेळात काही चाली राखीव ठेवाव्या लागतात. माझ्यावर विश्वास ठेवा. उमेदवार आणि नगरसेवक आपला असेल. १६ जानेवारी रोजी फटाके जुना पुणे नाका येथील पावन गणपतीसमोरच फुटतील असे सांगत पुरुषोत्तम बरडे यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.

Tags: hello solapurpoliticsPurushottam BardeShivsena Thackerey gatsolapurSolapur Citysolapur mahapalikaSolapur Mahapalika Election 2026solapur newssolapur political newssolapur politicsUttara Barade Bachuteउत्तरा पुरुषोत्तम बरडेपुरुषोत्तम बरडेप्रभाग क्र. 7
Previous Post

मोहोळच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सोमेश क्षीरसागरांना आश्वासन

Next Post

सोलापूरच्या राजकारणात मोठी घडामोड; एमआयएमचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Related Posts

आमदार देवेंद्र कोठेंनी ‘या’ महत्वाच्या विषयावर विधानसभेचे लक्ष वेधले; सर्व स्तरातून होतेय कौतुक

February 26, 2026

सोलापूर महापालिकेकडून संत गाडगेबाबा महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

February 24, 2026

सोलापूरच्या स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्यांचा मास्टर स्ट्रोक; एकीकडे निष्ठावंतांना संधी दुसरीकडे भविष्याचा विचार

February 23, 2026

मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळला; आयटी पार्कसाठी 50 एकर जमीन देण्याचे आदेश

February 23, 2026

मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

February 21, 2026

आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे; मंत्री चंद्रकांत पाटलांचे मोफत कौशल्य विकास केंद्राच्या उदघाटनावेळी गौरवोद्गार

February 18, 2026
Next Post

सोलापूरच्या राजकारणात मोठी घडामोड; एमआयएमचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

February 28, 2026

सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

February 27, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड

February 26, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात 3 तरुणांचा अपघाती मृत्यू; 3 पैकी 1 गोसेवक असल्याने अपघात की घातपात?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!

WhatsApp Share