Monday, May 25, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

Hello Solapur by Hello Solapur
22-May-2026 14:36 pm
in राजकारण
0
BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण
0
SHARES
587
VIEWS

HELLO SOLAPUR | सोलापूर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. सोलापूरमध्ये भाजपकडून उमेदवार कोण याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे रणजितसिंह शिंदे, माजी भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत.

दरम्यान यामध्ये बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे नाव जोरदार चर्चेत आलेय. आज मुंबई ते सोलापूर असा विमानप्रवास पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘हॅलो सोलापूर’च्या सूत्रांच्या माहितीनुसार आज 22 मे 2026 रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी एकत्र विमान प्रवास केला. मुंबईहून ते सोलापूरला दाखल झाले. त्यामुळे राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीने चर्चेला जोर धरला आहे.

काल बार्शीमध्ये राजेंद्र राऊत समर्थकांनी फटाक्यांची अतिशबाजी करत जल्लोष केल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राजेंद्र राऊतांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याची बोलले जात आहे..

असं असलं तरी भाजपच्या आजवरचा इतिहास पाहता भाजपचे धक्कातंत्र वेगळे असते. याशिवाय आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीची रणनीती पाहता माढा लोकसभेत भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे माढा लोकसभेच्या दृष्टीने माढा किंवा पंढरपूर हे विधानसभा मतदारसंघ भाजपच्या संघटनात्मक दृष्टीने कमकुवत आहेत. त्यामुळे भाजप तिकडे लक्ष केंद्रित करण्याची शक्यता दाट आहे.

मात्र आज अचानक पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या विमानप्रवासामुळे अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांचा प्रवास हा योगायोग होता की राजकीय चर्चेचा होता हे आगामी काळ ठरवेल.

Tags: hello solapurJaykumar GoreMarathi newsPolitical newsRajendra Rautsolapur newssolapur politics
Previous Post

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

Related Posts

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

May 15, 2026

‘या’ कारणामुळे महिला आरक्षण विधेयकातील पहिले डिलिमिटेशन विधेयक नामंजूर!

April 17, 2026

शिवसेना झेडपी सदस्यांनीच केली म्हेत्रे गटाची राजकीय कोंडी; ‘मैत्रीसाठी माघार’चे कारण देत तलवार म्यान

April 16, 2026

मुलांच्या सर्वांगण विकासासाठी समर्पित नाट्य शाळेच्या वतीने ‘गंमत बालनाट्य शिबीराचे’ आयोजन

April 11, 2026

सोलापुरातील ‘या’ पदाधिकाऱ्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडून शिफारस; भाजप वर्तुळात मोठी चर्चा

April 7, 2026

सोलापूर झेडपीचे अध्यक्षपद बार्शीकडे? यांचे नाव जवळपास निश्चित

March 15, 2026

ताज्या बातम्या

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

BREAKING पालकमंत्री गोरे अन् राजेंद्र राऊतांचा एकत्रित विमान प्रवास; विधान परिषदेच्यादृष्टीने चर्चेला उधाण

May 22, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In