Saturday, June 6, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

ट्रक ड्रायव्हरच्या मुलाला महागडी शस्त्रक्रिया सांगितल्याने कुटुंब आर्थिक संकटात; मात्र मुख्यमंत्र्यांनी केली मोठी मदत

Hello Solapur by Hello Solapur
22-Apr-2026 10:46 am
in महाराष्ट्र
0
0
SHARES
166
VIEWS

HELLO SOLAPUR | महागड्या वैद्यकीय उपचारांमुळे हतबल झालेल्या सामान्य कुटुंबाला शासनाच्या मदतीने मोठा दिलासा मिळाला आहे. अहिल्यानगर येथील महेश चंद्रकांत फलके यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून ३ लाख रुपयांहून अधिक मदत मिळाल्याने या तरुणाला जीवदान मिळाले आहे. या मदतीबद्दल फलके कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

अहिल्यानगर येथील ट्रक ड्रायव्हर चंद्रकांत फलके यांच्या मुलाला व्हस्क्युलर अँड इंडो व्हस्क्युलर सर्जरी सांगण्यात आली होती. मात्र याचा खर्च या कुटुंबाला करणे अशक्य होते. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने 3 लाखापेक्षा अधिक मदत केल्याने कुटुंबाचा भार हलका झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केलीय.

नेमकी घटना काय?

ऋषिकेश चंद्रकांत फलके यांचे बंधू महेश फलके यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुणे येथील नामांकित रुबी हॉल क्लिनिक मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना तात्काळ व्हस्क्युलर अँड इंडो व्हस्क्युलर सर्जरी करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र खाजगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च मोठा असल्याने फलके कुटुंब आर्थिक विवंचनेत होते.

या कठीण प्रसंगात फलके कुटुंबाने रुग्णसेवक आनंद गोसकी यांच्या माध्यमातून मदतीसाठी पाठपुरावा केला. त्यांना याकामी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी रामेश्वरभाऊ नाईक आणि रुग्णसेवक आनंद गोसकी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधून उपचारांसाठी मदतीची विनंती करण्यात आली होती.

३ लाखांचे अर्थसाहाय्य :
रुग्णाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने ३ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला. या निधीमुळे महेश फलके यांच्यावर योग्य उपचार होऊ शकले.

“आमच्या संकटाच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या टीमने आम्हाला जी मदत केली, ती आम्ही कधीही विसरणार नाही. त्यांच्यामुळेच माझ्या भावाचे प्राण वाचले आहेत. आम्ही संपूर्ण फलके परिवारातर्फे त्यांचे ऋणी आहोत.”

– ऋषिकेश फलके (रुग्णाचे भाऊ)

या मदतीमुळे फलके कुटुंबाला मोठा आधार मिळाला असून, परिसरात या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे. “रुग्णाच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हीच खरी रुग्णसेवा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गरजूंपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना आम्ही आजवर आधार देऊ शकलो आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.”

– आनंद गोसकी, रुग्णसेवक

Tags: Anand Goski Solapurcm devendra fadanvisCm Releaf FundDevendra FadanvisHealth helphello solapurOSD Rameshwar Naik
Previous Post

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

Next Post

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

Related Posts

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

‘राष्ट्रवादी दादा गटाचे 22 आमदार पवार गटाच्या संपर्कात’ हे वृत्त खोडसाळपणाचे : दादा गट

May 20, 2026
सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

सोलापूरसह २० मे रोजी औषध दुकाने बंद राहणार; देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक

May 19, 2026
Next Post
खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

खासदार प्रणिती शिंदेंनी पालकमंत्री जयकुमार गोरेंना पाठवली अब्रुनुकसानकीची नोटीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

सोलापूर विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार?

June 4, 2026
सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

सोलापुरातील आदिला नाल्यावरील रेड अन् ब्लू लाईनचा प्रश्न मार्गी लागणार; पालकमंत्र्यांचा शब्द

June 3, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In