Sunday, July 26, 2026
  • Login
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ
No Result
View All Result
No Result
View All Result
Hello Solapur
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

सहकार भारतीच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न : जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी

Hello Solapur by Hello Solapur
18-Apr-2026 20:18 pm
in महाराष्ट्र
0
0
SHARES
206
VIEWS

HELLO SOLAPUR | व्हिजन एक्स्पो फॉर वुमेन एम्पावरमेंट या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी यांनी केले.

सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने आयोजित महिला उत्पादित वस्तुच्या राज्यस्तरीय एक्स्पोच्या कार्यालयाचे उदघाटन चौपाड येथे कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी या एक्स्पोच्या स्वागताध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे, विभाग प्रमुख संतोष गायकवाड, डॉ. जयंत शेळगीकर, प्रशांत बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांची संघटन शक्ती एकत्र करून त्यांना सक्षम करणे हेच सहकार भारतीचे काम आहे. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्यांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. असेही यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह ऋषीकेश कुलकर्णी यांनी सांगितले.

दि. 24 ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत नॉर्थकोट मैदानावर भव्य दिव्य असे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील महिलांकडून उत्पादित करण्यात आलेल्या वस्तु आणि पदार्थाचे राज्यस्तरीय प्रदर्शन सोलापूर मध्ये पहिल्यांदाच होत असल्याचे या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले.

कला, स्वाद व संस्कृतीचा अनोखा संगम नॉर्थकोटच्या मैदानावर होणार आहे याचा अनुभव घेण्यासाठी महिला पुरूषांनी मोठ्यासंख्येने यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

प्रारंभी महिला प्रकोष्ठ प्रमुख प्राची धामणगांवकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर फित कापून आणि भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करून कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी किरण करकमकर, यशवंत बुर्‍हाडे, अर्चना कुलकर्णी, श्रृती पवार यांच्यासह सहकार भारतीचे पदाधिकारी महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Tags: hello solapurRSS SolapurSahkar Bhartisolapur newsWomen Empowerment
Previous Post

सोलापूरमध्ये वीज पडून एका तरुणाचा जागीच मृत्यू

Next Post

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

Related Posts

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026
विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

विधानपरिषद निवडणुकीत भाजपकडून सोलापूरसह राज्यभरात अनेकांना धक्के

June 1, 2026

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार?; 30 मेपासून आमरण उपोषणावर ठाम मनोज जरांगे पाटील

May 28, 2026
पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

पोलीस संरक्षण ते पेन्शन; प्रदेशाध्यक्ष मनिष केत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन

May 27, 2026
भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

भारतातील एलपीजी गॅस तुटवड्यावर सोलापूरच्या बालाजी अमाईन्स कंपनीने दिला पर्याय!

May 21, 2026
Next Post

सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर; नक्की काय या योजनेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

सोलापूर आसावा प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा 16 वर्षांनंतर पुन्हा भरला शाळेचा वर्ग

July 5, 2026
रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

रक्तदान, शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपणाने नगरसेवक अनंत जाधव यांचा वाढदिवस साजरा

July 5, 2026
‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

‘साम टीव्ही’चे सोलापूर प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार

June 29, 2026

Top 5 news

  • अक्कलकोटच्या माजी आमदाराच्या नातवासह तिघांवर गुन्हा दाखल; आमदार कल्याणशेट्टींची बदनामी भोवली

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण उघड; सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरातील 102 नवनिर्वाचित नगरसेवकांची यादी; भाजपचा ऐतिहासिक विजयी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पती-पत्नीचे मृतदेह आढळले; आत्महत्या की घातपात तपास सुरु

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अनगर नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, पण तरीही निवडणूक लागणार?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • home
  • trial

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • शहर
  • जिल्हा
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • व्हिडीओ

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In